आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Vicky Kaushal Started Shooting For Laxman Utekar's Film Amidst Preparations For His Marriage With Katrina, Sara Ali Khan Is The Lead Actress

काम महत्त्वाचे:कतरिनासोबत लग्नाच्या तयारीदरम्यान विकी कौशलने सुरु केले लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण, विकीसह मुख्य भूमिकेत सारा अली खान

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात विकीसोबत सारा अली खान दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. डिसेंबरमध्ये हे दोघे लग्न करणार आहेत, त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. आता आलेल्या वृत्तानुसार, विकीने लग्नाच्या काही दिवस आधी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे.

अलीकडेच आलेल्या पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, विकी कौशल दिनेश विजानच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपटासाठी सारा अली खानसोबत शूटिंग करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगला विकीने 17 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरुवात केली.

लग्नावर चित्रीकरणाचा परिणाम होणार नाही
बातमीनुसार, विकी कौशलच्या शूटिंगचा त्याच्या लग्नावर कोणताही परिणाम होणार नाही. विकी नोव्हेंबरपर्यंत चित्रपटाचे शूटिंग करणार असून लग्नाआधी 15 दिवसांचा ब्रेक घेणार आहे. चित्रपटाचे निर्माते सध्या मुंबईत इनडोअर सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. मुंबईनंतर या रोमँटिक कॉमेडीचे शूटिंग मध्य प्रदेशात डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणार आहे.

विकी-कतरिनाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे
विकी कौशल-कतरिना कैफ 7 ते 9 डिसेंबर दरम्यान सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस फोर्ट हॉटेलमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. या कपलने हॉटेलचे बुकिंग निश्चित केले आहे, त्यानंतर या व्हीआयपी लग्नाची तयारी तेथे सुरू झाली आहे. लग्नाची बातमी समोर आल्यानंतर आता यांनी लग्नस्थळाची सुरक्षाही वाढवली आहे. भास्करच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या 3 दिवसांच्या सुरक्षेसाठी विकी आणि कतरिनाने 15 लाख रुपये खर्च केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...