आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार उधम:विकी कौशलने सांगितले - ‘सरदार उधम’साठी भारतासह 6 देशांच्या 350 तंत्रज्ञांनी 19 व्या शतकातील अमृतसर आणि लंडन उभे केले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा नव्हे तर विचारसरणीचा बायोपिक : विकी

अभिनेता विकी कौशलचा ‘सरदार उधम’ आज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. "राजी' आणि "उरी' नंतर देशभक्तीवर आधारित त्याचा हा तिसरा चित्रपट आहे. या मुलाखतीत विकीने चित्रपटाच्या तयारीवर चर्चा केली...

शहीद उधम यांच्या विचाराचा प्रभाव पडला का?
मी आधी स्वातंत्र आणि समानतेविषयी विचार करायचो, मात्र सरदार उधम सिंगची कथा ऐकल्यानंतर सर्व विचार बदलले. सरदार उधम सिंग यांना जगातिक राजकारणाची सखोल माहिती होती. असे कोणतेही पुस्तक नाही,जे त्यांनी वाचले नसेल. जेव्हा क्रांतिकारक आपसात भेटायचे तेव्हा ते सांगत, भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र असावा. त्यामुळे हा चित्रपट एखाद्या व्यक्तीचा बायोपिक नसून एका विचारसरणीचा बायोपिक आहे.

चित्रपटासाठी त्या काळातील अमृतसर आणि लंडन कसे उभारण्यात आले ?
19 व्या शतकातील अमृतसर आणि लंडन उभारण्यासाठी आम्हाला जगभरातील तंत्रज्ञाना हायर करावे लागले. यासाठी भारताबरोरबच रशिया, इंग्लंड, पॉलेंड आणि हंगरी अशा 6 देशांतील सुमारे 350 तंत्रज्ञांनी आमच्यासोबत काम केले. हा चित्रपट केल्यानंतर मला देशभक्तीवरील चित्रपट आवडू लागले आहेत. मला त्यांच्याशी जणू काही प्रेम जडले आहे. त्यामुळे आता मी आपल्या देशातील शूरवीर आणि राजे-महाराजे यांच्या भूमिका करू इच्छि आहे. या काळात निर्माते इतिहास चांगल्या प्रकारे दाखवत आहे. पुढे मेघना गुलजार यांचा “सॅम बहादुर’ करत आहे, तोदेखील या जोनरचा चित्रपट आहे.

तुझी वजन वाढणे आणि कमी करण्याची खूप चर्चा होती, कसे केले ?
शूटिंगदरम्यान मी एका महिन्यात 14 ते 15 किलो वजन कमी केले आणि पुन्हा वाढवले. खरंतर, अमृतसरच्या भागात मला फक्त 20 वर्षांचा उधम दिसायचे होते. त्यानंतर त्याच्या फक्त 25 ते 29 दिवसानंतरच लंडनच्या दृश्याचे शूटिंग करायचे होते. तेथे मला 40 च्या वयातील उधम सिंग दिसायचे होते.

करण जोहर पुन्हा 'तख्त’वर काम सुरू करणार असल्याचे ऐकले?
याची माहिती तर आम्हा कलाकारांनादेखील नाही. असो, सध्या तर ऐतिहासिक चित्रपटावर काम करत आहे. मेघनासोबत “सॅम मानेकशॉ’ हा बायोपिक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...