आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकीचा कारनामा:अभिनेता विकी कौशलने खरेदी केली 2 कोटींची SUV लँड रोव्हर, फोटो शेअर करत लिहिले - 'स्वागत आहे मित्रा घरी!'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही एसयूव्ही आठ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेल्या अभिनेता विकी कौशलने रविवारी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. विकीने नुकतीच नवीन लग्झरी कार खरेदी असून त्याने आपल्या नवीन लँड रोव्हर कारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो कारच्या समोर उभा असल्याचे दिसत आहे. या कारचे वर्णन करताना विकीने आपला नवीन मित्र म्हटले आहे.

विकीची लँड रोव्हर ही 5 सीटर लक्झरी कार आहे
डीप ब्लू रेंज रोव्हरसमोर स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करत विकीने लिहिले - " स्वागत आहे मित्र घरी! या अद्भूत अनुभवाबद्दल नवनीत मोटर जगुआर लँड रोव्हर मुंबईचे आभार.'

विकीच्या लँड रोव्हर रेंज रोव्हर 5-सीटर लक्झरी कारची किंमत 2.10 - 4.38 कोटीपर्यंत आहे. ही एसयूव्ही आठ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

विकीचे पाइपलाइनमध्ये अनेक चित्रपट
विकीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, तो लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' चित्रपटात मानेक शॉ यांची मुख्य भूमिका साकारताना दिसेल. हा चित्रपट मानेक शॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय विकी कौशल 'शहीद उधम सिंग' आणि 'इम्मोर्टल अश्वत्थामा'मध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...