आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मुंबईला परतणार विकी-कॅट:रणथंबोरहून डबल इंजिन हेलिकॉप्टरने जयपूर विमानतळावर उतरणार बॉलिवूड कपल, तेथून मुंबईला उड्डाण करतील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नानंतर विकी-कतरिनाने किल्ल्याबाहेर असलेल्या आपल्या चाहत्यांसाठी मिठाई आणि केक पाठवले.

गुरुवारी संध्याकाळी विकी-कतरिनाने लग्नाच्या बेडीत घेतले. हा हायप्रोफाईल विवाहसोहळा सवाई माधोपूरच्या बरवाडा किल्ल्यावर झाला. बॉलिवूडचे हे नवविवाहित दाम्पत्य आज मुंबईत परतणार आहे. विकी-कतरिना रणथंबोरहून डबल इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरमधून जयपूर विमानतळावर उतरेल. मग येथून पुढील फ्लाइट घेतील.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत कतरिनाने लिहिले की, 'आमच्या हृदयातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर आज आम्हाला इथवर घेऊन आले आहे. आमच्या नवीन आयुष्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.'

त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन दोन दिवस चालले. बरवाडा किल्ल्यामध्ये मंडप सजवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी दिल्लीहून फुले मागवण्यात आली. लग्नानंतर विकी-कतरिनाने किल्ल्याबाहेर असलेल्या आपल्या चाहत्यांसाठी मिठाई आणि केक पाठवले. बाहेर उपस्थित ग्रामस्थांनी लग्नासाठी दोघांचे अभिनंदन केले. विकी-कतरिनाचे काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये कतरिना लाल रंगाच्या वेडिंग आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

लग्नानंतर विकी आणि कतरिना यांनी चाहत्यांसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
लग्नानंतर विकी आणि कतरिना यांनी चाहत्यांसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
9 डिसेंबर रोजी थाटात दोघे विवाहबंधनात अडकले.
9 डिसेंबर रोजी थाटात दोघे विवाहबंधनात अडकले.
राजस्थानमध्ये दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले.
राजस्थानमध्ये दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले.
अनेक दिवस दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
अनेक दिवस दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
सफेद शेरवानीमध्ये विकी कौशल
सफेद शेरवानीमध्ये विकी कौशल
लाल रंगाच्या लहेंगा चोलीत कतरिना कैफ
लाल रंगाच्या लहेंगा चोलीत कतरिना कैफ
लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर कतरिना आणि विकी यांनी गावातील लोकांसाठी मिठाई पाठवली.
लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर कतरिना आणि विकी यांनी गावातील लोकांसाठी मिठाई पाठवली.
हॉटेल मॅनेजमेंटचा स्टाफ चाहत्यांसाठी मिठाई आणि केक घेऊन पोहोचला.
हॉटेल मॅनेजमेंटचा स्टाफ चाहत्यांसाठी मिठाई आणि केक घेऊन पोहोचला.
हा फोटो विकी-कतरिनाच्या लग्नस्थळाचा असल्याचे सांगितले जात आहे.
हा फोटो विकी-कतरिनाच्या लग्नस्थळाचा असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...