आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा थिएटरमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’:मुंबई, पुण्यासह देशातील 29 शहरांमध्ये पुन्हा रिलीज झाला विकी कौशलचा चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वी 26 जुलै 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

अभिनेता विकी कौशल स्टारर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट दोन वर्षानंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल होतोय. 26 जानेवारीच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग आजही प्रत्येकाच्या तोंडी आहे. 26 जुलै 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला लोकांनी उदंड प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटामधील विकी कौशलच्या दमदार अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते.

तरण आदर्श यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “उरी थिएटरमध्ये परत येत आहे. या चित्रपटाने 2019 मध्ये सिनेरसिकांची मने जिंकली होती.' मुंबई, पुणे, कोलकाता, नोएडासह देशातील 29 शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाला आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ऑडियोग्राफी, बेस्ट म्युझिक डायरेक्शन आणि बेस्ट अ‍ॅक्टर यांचा समावेश आहे.

हा चित्रपट 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...