आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंसिका मोटवानीचा व्हिडिओ आला समोर:भावी नवऱ्याच्या पहिल्या लग्नाच्या प्रत्येक विधीत होती हजर, केला होता धमाकेदार डान्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. हंसिका अखेर कोणाशी लग्न करत आहे याचा उलगडा झाला आहे. पण हंसिकाच्या होणा-या नव-याचे हे दुसरे लग्न आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? इतकेच नाही तर हंसिका त्याच्या पहिल्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली होती. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात हंसिका तिच्या होणा-या नव-याच्या पहिल्या लग्नात जबरदस्त डान्स करताना दिसली होती. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. हंसिकाचा भावी पती सोहेल कथुरिया याचे 2016 मध्ये रिंकी नावाच्या मुलीसोबत पहिले लग्न झाले होते. हंसिका या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली होती.

भावी पतीच्या पहिल्या लग्नात केला होता जबरदस्त डान्स
अलीकडेच हंसिका मोटवानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिचा भावी पती सोहेल कथुरियाच्या पहिल्या लग्नात नाचताना दिसत आहे. 2016 मध्ये गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगचा हा व्हिडिओ आहे. या लग्नातील रोका सेरमनीपासून ते पूल पार्टी आणि संगीत सेरेमनीत हंसिकाचा सहभाग होता. सोहेल कथुरियाचे 2016 मध्ये पहिले लग्न झाले होते.

हंसिका आणि सोहेल 4 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत
हंसिकाने अलीकडेच सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर करत सोहेलसोबत साखरपुडा झाल्याचे सांगितले होते. सोहेलने अगदी फिल्मी स्टाइलने हंसिकाला प्रपोज केले होते. सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून रोमँटिक अंदाजात हंसिकाला लग्नाची मागणी घातली. हंसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करत त्याला 'Now&Forever' असं कॅप्शन दिले. हंसिका आणि सोहेल हे बिझनेस पार्टनर आहे. दोघे एका इव्हेंट कंपनीचे मालक आहेत.

हंसिका आणि सोहेलचे लग्न 4 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये होणार आहे. हे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार असून त्यासाठी जयपूरच्या 450 वर्षे जुन्या किल्ल्याची निवड करण्यात आली आहे. मुंडोटा किल्ल्यात हंसिकाच्या लग्नाची सर्व तयारी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपूरच्या पॅलेसमध्ये 2 डिसेंबरला सूफी नाईट, 3 डिसेंबरला मेंदी आणि संगीत आणि 4 डिसेंबरला लग्नाचे विधी होतील. या सर्व सोहळ्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. मात्र, अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शाका लाका बूम बूमद्वारे लोकप्रिय झाली हंसिका
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर हंसिका लवकरच 'राउडी बेबी' या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 'शका लाका बूम-बूम' सारख्या टीव्ही शोद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. एवढेच नाही तर 'कोई मिल गया' या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर हंसिका 'आपका सुरूर' या चित्रपटात गायक हिमेश रेशमियासोबत मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटात हंसिका अचानक मोठी दिसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. हंसिका साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असून तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात.

बातम्या आणखी आहेत...