आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतचा पूजा करतानाचा व्हिडिओ आला समोर; पंडित म्हणाले- तो नैराश्यात नव्हता, रिया चक्रवर्ती या पूजेत सहभागी झाली नव्हती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पूजेच्या वेळी सुशांतने सोवळे नेसले होते. पूजेला 6 तास लागले होते. यावेळी सुशांतने ब्राह्मणांना भोजनही दिले होते. - Divya Marathi
पूजेच्या वेळी सुशांतने सोवळे नेसले होते. पूजेला 6 तास लागले होते. यावेळी सुशांतने ब्राह्मणांना भोजनही दिले होते.
  • सुशांत सिंह राजपूतने एप्रिल 2019 मध्ये वांद्रे येथील फ्लॅटमध्ये रुद्राभिषेक आणि कालसर्प योगाची पूजा केली होती.
  • पंडित गोविंद नारायण यांनी सांगितले की, त्यावेळी सुशांत खूप आनंदीत होता. तो आत्महत्या करू शकतो यावर अद्याप विश्वास बसत नाहीये.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सुमारे 2 महिन्यांनी त्याच्या आयुष्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो कुटुंबासमवेत रुद्राभिषेक आणि कालसर्प योगाची पूजा करताना दिसतोय. वांद्रे येथील कॅपरी हाइट्स बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅट (माँट ब्लॉकच्या आधीचे घर) मध्ये ही पूजा करण्यात आली होती. पंडित गोविंद नारायण यांनी 9 एप्रिल 2019 रोजी ही पूजा सुशांतच्या घरी केली होती.

पंडित गोविंद यांच्या म्हणण्यानुसार, या पूजेला सुशांत, त्याची बहीण मितू सिंग आणि तिचे पती, अन्य काही लोक आणि सुशांतच्या घरी काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होते. यावेळी सुशांत खूप खूश दिसला. पंडित म्हणाले की, त्यावेळी सुशांत नैराश्येतून जातोय, असे क्षणभरही वाटले नाही. तो आत्महत्या करु शकतो, यावर अद्याप विश्वास बसत नाहीये, असेही ते म्हणाले.

  • पूजा 4 तास चालली, सुशांतने 11 ब्राह्मणांना भोजन दिले

पंडित गोविंद यांनी सांगितले की, ही पूजा 4 तास चालली. यादरम्यान सुशांत संपूर्ण वेळ सोवळ्यात होता. पूजा संपल्यानंतर त्याने स्वतः 11 ब्राह्मणांना भोजन दिले. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 6 तास चालली. ही पूजा घरात सुख, शांती, समृद्धी आणि धन लक्ष्मी प्राप्तीसाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी नटराजाच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली होती.

  • व्हिडिओमध्ये रिया दिसत नाही

व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्ती दिसत नाही. पंडित गोविंद नारायण यांनीही रियाने या पूजेला हजेरी लावली नसल्याची पुष्टी केली आहे.

  • पंडित गोविंद नारायण यांनी एकदाच पूजा केली

पंडित गोविंद यांनी सांगितल्यानुसार, या एका पूजेशिवाय अन्य कोणत्याही पूजेसाठी त्यांच्याशी कधीच संपर्क साधला गेला नाही. सोबतच रिया चक्रवर्तीने सुशांतच्या घरात किंवा पावना डॅमच्या फार्म हाऊसमध्ये कधी तंत्र-मंत्र संबंधित पूजा केल्याचे ऐकिवात नसल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...