आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्यावर मास्क लावून गणरायाला घ्यायला पोहोचला राज कुंद्रा:नेटक-यांनी केले ट्रोल, म्हणाले- अरे भावा, देवापासून काय चेहरा लपवायचा?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मास्क लावून फिरताना दिसत आहे. राज कुठेही गेला तरी तो त्याचा चेहरा मास्कने झाकलेला असतो. आता अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो काळा मास्क घालून गणपती बाप्पा घरी न्यायला पोहोचला आहे. शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्वस साजरा करते. मात्र यावर्षी तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तिच्याऐवजी तिचा पती राज कुंद्रा गणपती बाप्पाला घेण्यासाठी लालबागमध्ये पोहोचला. व्हिडिओमध्ये राज गणेशाच्या मूर्तीसमोर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तो गणरायाच्या पायाला स्पर्श करून हात जोडताना दिसत आहे. मास्क लावून गणरायाची प्रार्थना करताना बघून सोशल मीडिया यूजर्सनी त्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "असे देवा, असा चेहरा का लपवतोय भावा". तर आणखी एकाने लिहिले की, "असे काम का करतोस की तोंड लपवावे लागेल". व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...