आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड विश्वावर शोककळा:विधु विनोद चोप्रा यांचे मोठे भाऊ वीर चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन, हॉररपटांसाठी प्रसिद्ध कुमार रामसे यांची प्राणज्योत मालवली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन आठवडे वीर चोप्रा यांनी दिली कोरोनाशी झुंज

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली असताना आज बॉलिवूडमधून दोन दुःखद बातम्या आल्या आहेत. चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांचे ज्येष्ठ बंधू आणि चित्रपट निर्माते वीर चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वीर चोप्रा यांच्याशिवाय हॉरर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले रामसे ब्रदर्समधील सर्वात मोठे भाऊ कुमार रमसे यांनीही वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

तीन आठवडे वीर चोप्रा यांनी दिली कोरोनाशी झुंज
रिपोर्ट्सनुसार, निर्माता वीर चोप्रा यांना मालदीवमधील व्हेकेशनदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. जवळजवळ 3 आठवडे त्यांनी कोरोनाशी झुंज दिली. अखेर बुधवारी त्यांची ही झुंज कायमची संपली. वीर चोप्रा यांनी त्यांचे धाकटे बंधू विधू विनोद चोप्रा यांच्या अनेक चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले. त्यांनी बॉबी देओल आणि शबाना रजा स्टारर 'करीब' या चित्रपटाद्वारे काम सुरु केले होते. मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स या चित्रपटांचे ते क्रिएटिव्ह प्रोड्युसर होते.

त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट ब्रोकन हॉर्सस हा होता. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता. वीर यांच्या पश्चात पत्नी नमिता नायक चोप्रा असून त्यांनी साउंड डिझायनर म्हणून काम केले आहे.

रामसे ब्रदर्स - कुमार, केशु, तुलसी, करण, किरण, श्याम, गंगू आणि अर्जुन रामसे
रामसे ब्रदर्स - कुमार, केशु, तुलसी, करण, किरण, श्याम, गंगू आणि अर्जुन रामसे

हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
कुमार रामसे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांनी ऋषी कपूर स्टारर 'खोज' या चित्रपटासह रामसे ब्रदर्सचे अनेक हॉरर चित्रपट लिहिले. त्यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार यांनी हिरानंदानी येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

गोपाळ म्हणाले, "आज सकाळी साडे पाज वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील."

  • कुमार हे निर्माता एफयू रमसे यांच्या सात मुलांपैकी थोरले होते. केशू, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन ही कुमार यांच्या सहा भावांची नावे आहेत. रामसे ब्रदर्सनी 70 आणि 80 च्या दशकात कमी-बजेट कल्ट चित्रपटांची निर्मिती केली होती.
  • कुमार यांच्या चित्रपटांमध्ये पुराना मंदिरा (1984, साया (1989) मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी काम केले होते. 1989 मध्ये आलेला खोज या हिट चित्रपटात नसीरुद्दीन शाह झळकले होते. याशिवाय 1979 मध्ये उन्होंने और कौन? आणि 1981 मध्ये दहशत या चित्रपटांचीही निर्मिती केली. कुमार यांच्या पश्च्यात पत्नी शीला आणि राज, गोपाल आणि सुनील ही तीन मुले आहेत.
बातम्या आणखी आहेत...