आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनने शेअर केला फनी व्हिडिओ:गुगलकडे केली एका खास गाण्याची फर्माइश, मिळाले मजेशीर उत्तर

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मोठ्या पडद्यासह सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असते. आता अलीकडेच, विद्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुगलसोबत काहीतरी बोलताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये विद्या फ्री साइजच्या टी-शर्टमध्ये दिसतेय. व्हिडिओमध्ये तिने 1995 साली आलेल्या 'नाजायज' चित्रपटातील 'अभी जिंदा हूँ तो जी लेने दो' हे प्रसिद्ध गाणे गायले आहे आणि तेच गाणे गुगलकडे प्ले करण्याची ती विनंती करते. ज्यावर गुगलकडून रिप्लाय येतो, 'फक्त दोनच ओळी उरल्या आहेत, त्याही तूच गा.' हे ऐकून विद्या बालनला धक्काच बसतो. व्हिडिओ शेअर करत विद्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅलो गुगल.' आता तिच्या या मजेदार व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...