आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Vidya Balan Became A Forest Officer In The Movie, Said– This Film Attacks The Common Belief, Which Questions The Male Actions Of Women

शेरनी:फिल्ममध्ये फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत विद्या बालन, म्हणाली - सेटवर आम्ही खूप धमाल करत असतो, पण जंगलात शूटिंग करताना मोठ्याने ओरडूही शकत नव्हतो

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • विद्याने शेअर केले ‘शेरनी’च्या शूटिंगचे अनुभव...

गेल्या वर्षी गणितज्ञ शकुंतला देवीची भूमिका साकारल्यानंतर आता विद्या बालन 'शेरनी' चित्रपटात वन अधिकारी साकारणार आहे. याचे दिग्दर्शन ‘न्यूटन’ फेम अमित मासुरकरने केले आहे. योगायोगाने हादेखील ओटीटी माध्यम अॅमेझॉन प्राइमवर येणार आहे. या खास प्रसंगी विद्या बालनने ‘दिव्य मराठी’सोबत चर्चा केली...

 • ही कोणत्या प्रकारची शेरनी आहे? बॉलिवूडच्या ‘शेरनी’कडे हा चित्रपट कधी आला होता?

ही शेरनी गर्जना करत नाही, आवाज करत नाही तर थेट हल्ला करते. मला आठवते, कदाचित दीड वर्षापूर्वी आली असावी. त्यावेळी अमित मासुरकर माझ्याकडे आले होते. आम्ही सोबत अनेक जाहिराती केल्या आहेत. ते म्हणाले, स्टोरी आयडिया आधी ऐका, चांगली वाटली तर त्याचा स्क्रिनप्ले आणि संवाद लिहितो.

 • कथा ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती ?

मला ती आयडिया खूप आवडली. हिंदी सिनेमात जंगलावर आधारित कथा हव्या तशा आल्या नाहीत. अमित मासुरकर यांनी ‘न्यूटन’ बनवला होता. त्यात जंगल दाखवण्यात आले हाेते मात्र तो पूर्णपणे जंगलावर आधारित नव्हता. शिवाय त्यांच्या चित्रपटात एक सामाजिक संदेशही असतो. ते खूपच वेगळे दिग्दर्शक आहेत. शिवाय मलादेखील जंगलातील जग अनुभवण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे मी हाेकार दिला होता.

 • वन अधिकाऱ्याला पटकन स्वीकारले जात नाही ?

खरं तर, अमितचा हा चित्रपट याच विषयावर आधारित आहे. यातून अनेक गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. खंर तर, लोकांची एक धारणा झाली आहे की, पुरुषांच्या अधिकार क्षेत्रातील काम महिला कसं काय करु शकतात. वन अधिकाऱ्याच्या नोकरीत तर पुरुषच हवा असतो, असेच लोकांना वाटते. पोलिस विभागात आता कुठे महिलांना मान्यता मिळू लागली आहे मात्र वन विभागात तसे नाही. तिथे अजून खूप वेळ लागेल. शिवाय वन विभागावर चित्रपटदेखील कमी आले आहेत. निर्मात्याने या चित्रपटातून महिला अधिकाऱ्याला समोर आले आहे.

 • शूटिंगदरम्यान आदिवासीसोबत कधी भेट झाली का ?

नाही. त्यांच्यासोबत तर कधीच भेट झाली नाही. मात्र गावकऱ्यांना भेटलो. त्यांना जंगलाची बरीच माहिती होती. ते मोठ्या उत्साहाने सांगत, कोणती वनस्पती कशासाठी आहे. कोणती विषारी आहे. कोणता पाला कशावर चालतो. झाडावर ठसे आहेत येथे नक्कीच बिबट्या असेल.

 • तुम्हाला इंडस्ट्रीत काही अडचणी आल्या का?

नेहमीच. एकमेकांना जज करणे हा मानवी स्वभाव आहे. महिलांना नेहमी दुय्यम स्थानी पाहिले जाते. कपडे घालण्यावरुन ते बऱ्याच गोष्टीवर नावे ठेवली जातात.

 • विद्युत जामवाल म्हणाला होता, जंगलाच्या शूटिंगदरम्यान खास पद्धत वापरली होती, त्यामुळे प्राण्यांसोबत शूटिंगमध्ये अडचण आली नाही. तुम्ही कोणती पद्धती वापरली?

मध्य प्रदेश पर्यटनाची खूप मदत झाली. त्यांनी खूप सुविधा पुरवल्या. मात्र बंधन खूप होती. मोठ्याने ओरडू शकत नव्हतो. नाही तर सामान्य सेटवर आम्ही खूप धमाल मस्ती करत असतो. येथे सर्वांसाठी कडक निर्देश होते. सर्वांनीच त्याचे पालन शिस्तीने केले. त्यामुळे आम्ही वेळेवर शूटिंग पूर्ण करु शकलो. आमचा कधीच प्राण्यांशी सामना झाला नाही. फक्त दुपारच्या जेवणाच्या वेळी कुठुन काय माहीत वानरं यायचे. एका दृश्यात आम्ही सर्व समोसे खात होतो. तेथे अचानक वानरांची टोळी. मात्र ते आम्ही जाण्याची वाट पाहत होतो.

बातम्या आणखी आहेत...