आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणी मीडिया ट्रायल:तापसी पन्नूनंतर आता विद्या बालनने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, म्हणाली - 'एक महिला म्हणून तिचा होणारा द्वेष पाहून फार वाईट वाटतं'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री लक्ष्मी मंछूचे कौतूक करत विद्याने रियाच्या मीडिया ट्रायलला चुकीचे असल्याचे सांगत एक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. सीबीआयकडून तिची चौकशी सुरु आहे. दरम्यान सुशांतचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय सुशांतसाठी न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान मीडिया ट्रायलला सामोर जात असलेल्या रियाला काही सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.

आता विद्या बालनने देखील या प्रकरणी सुरु असलेल्या घटनाक्रमावर आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. तापसू पन्नूनंतर विद्या बालनने अभिनेत्री लक्ष्मी मंछूचे कौतूक करत रियाच्या मीडिया ट्रायलला चुकीचे असल्याचे सांगत एक पोस्ट लिहिली आहे. आरोप सिद्ध होण्याआधीच कुणालाही दोषी न ठरवण्याचे आवाहन विद्याने केले आहे.

अभिनेत्री लक्ष्मी मंछूने एक ट्विट करत सुशांत प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्या बालनने आपले मत व्यक्त केले आहे.

विद्याने लक्ष्मी मंछूचे ट्विट रिट्विट करत लिहिले, 'या प्रकरणावर इतके स्पष्टपणे मत व्यक्त करण्यासाठी गॉड ब्लेस यू लक्ष्मी मंछू. एका युवा अभिनेता असलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या अवेळी मृत्यू प्रकरणाची माध्यमांकडून अशा पद्धतीने सर्कस होणे फार दुर्दैवी आहे. एक महिला म्हणून रिया चक्रवर्तीचा होणारा द्वेष पाहून फार वाईट वाटते. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष नाही का? की आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी समजायचे? संविधानाने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचा सन्मान करायला हवा आणि कायद्याला त्याचे काम करु द्यायला हवे”, असे मत विद्याने मांडले आहे.

  • लक्ष्मी मंछूने काय लिहिले होते?

लक्ष्मी मंछूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, 'मी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली रिया चक्रवर्तीची संपूर्ण मुलाखत पाहिली. त्यानंतर मी यावर बोलावे की नाही असा विचार मनात आला. माध्यमांनी एका मुलीला राक्षस बनवून टाकले आहे आणि त्यावर अनेक लोक शांत बसले आहेत. मला या प्रकरणातील खरे काय आहे हे माहिती नाही. मात्र, मला विश्वास आहे की प्रामाणिक मार्गाने या प्रकरणातील खरे सर्वांसमोर येईल.'

'सुशांतला न्याय देण्याबाबत माझा न्यायव्यवस्थेवर आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या प्रत्येक तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, तोपर्यंत आपण राक्षस होऊन क्रुर वागण्यापासून स्वतःला दूर ठेऊ का? एका व्यक्तिला आणि तिच्या कुटुंबाला शिव्याशाप देणे थांबवू शकतो का? या प्रकरणी रिया आणि तिच्या कुटुंबाची सुरु असलेल्या मीडिया ट्रायलमुळे तिला किती त्रास होत असेल याचा मी केवळ अंदाज लावू शकते. जर माझ्यासोबत असे काही घडले असते तर माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत उभे राहावे असे मला नक्कीच वाटले असतं. तसेच पूर्ण सत्य समोर येईपर्यंत मला एकटे सोडा असे सांगावे वाटले असते. जे काही होत आहे त्याचा खूप त्रास होत आहे. आपण आपल्या मनातील विचार बोलू शकत नसू तर आपण खरंच विश्वासास पात्र आहोत का? मी माझ्या सहकाऱ्यासोबत उभी आहे', असेही लक्ष्मी मंछूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. .

  • तापसी पन्नूनेही दिला होता पाठिंबा

लक्ष्मीचे मत जाणून घेतल्यानंतर तापसी पन्नूनेदेखील रिया चक्रवर्तीला आपला पाठिंबा दिला होता. तिने लक्ष्मीचे ट्विट रिट्विट करत लिहिले होते, मी सुशांत किंवा रियाला ओळखत नाही. नागरिकांना लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ नये. जोपर्यंत चौकशी होऊन निकाल येत नाही तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा, असे तापसीने म्हटले.