आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जलसा'च्या निमित्ताने...:एखाद्या चित्रपटाला ‘स्त्रीप्रधान’ टॅग लावण्याची गरज पडणार नाही त्या दिवसाची प्रतीक्षा : विद्या बालन

किरण जैन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्याला पडद्यावर साकारायची चार्ली चॅप्लिनची भूमिका

2019 मध्ये दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी पहिल्यांदा विद्या बालनला ‘जलसा’ चित्रपटाची कथा ऐकवली होती. त्या वेळी तिने या कथेचा भाग होण्यास नकार दिला होता. मग नंतर ती त्यासाठी तयार झाली. एका खास बातचीतमध्ये विद्याने चित्रपट आणि सहकलाकारांवर चर्चा केली...

  • ‘जलसा’च्या विषयाबाबत काही तरी सांगा?

‘जलसा’ रहस्य, सत्य व असत्याचे जाळे आहे. चित्रपटाचा विषय म्हणजे तुम्ही त्या स्थितीत असता तर काय केले असते? या गोष्टीने मला चित्रपटाकडे ओढले. तुम्हाला हा प्रश्न चित्रपटातील प्रत्येक पात्राकडून जाणवेल. फक्त माया मेननकडून (भूमिकेचे नाव) नव्हे. ते या स्थितीत असते तर कोणी काय केले असते? विषय खूप सोपा आणि तितकाच अवघडही आहे. याचे कोणतेही थेट उत्तर नाही.

  • आधी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांना या चित्रपटासाठी नकार दिल्याचे ऐकले होते..

पहिल्यांदा सुरेश माझ्याकडे ‘जलसा’ची कथा घेऊन आले तेव्हा मला खरंच मजेशीर वाटली, मात्र त्या वेळी मी स्वत: मायाच्या भूमिकेसाठी तयार नव्हते. सामान्यपणे मी माझ्या प्रत्येक प्रकल्पाच्या भूमिकेत स्वत:ला थोडेफार जुळवून घेते. मात्र या चित्रपटात बिलकुल तसं दिसलं नाही. माझी प्रतिमा मायासारखी मुळीच नाही आणि यामुळेच मी सुरेशला नकार दिला होता. नंतर महामारीत विचार करण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. तेव्हा मी मायाच्या भूमिकेची समीक्षा करणे बंद केले आणि चित्रपटासाठी तयार झाले.

  • चित्रपटांना ‘फीमेल-ओरिएंटेड’ टॅग देणे किती आवश्यक ?

सामान्यपणे चित्रपटात पुरुष कलाकारालाच नायक म्हटले जाते. अजूनही इंडस्ट्रीत फीमेल सेंट्रिक चित्रपट कमी होतात आणि काही चित्रपटांना असा टॅग द्यावा लागतो. मला वाटते, जेवढे जास्त स्त्रीप्रधान चित्रपट होतील आणि चालतील तेव्हा ‘स्त्रीप्रधान’चा टॅग आपोआप दूर होईल. कोणत्याही चित्रपटात हीरोला डिफाइन करावे लागणार नाही.

  • शेफालीसोबतचा अनुभव कसा होता ?

शेफाली अप्रतिम कलाकार आहे. मात्र चित्रपटात आमचे एकत्र दृश्य नाही, त्यामुळे तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची जास्त संधी मिळाली नाही. मी शेफालीच्या कामाची चाहती आहे. आम्हाला जास्त सराव वा टेक घेण्याची गरज पडली नाही. आम्ही फक्त एकदुसऱ्याच्या हावभावावर आणि संवादावर प्रतिक्रिया द्यायचो, जे पडद्यावर खूप सहजपणे दिसायचे. काही वेळातच तिच्याकडून खूप शिकायला मिळाले.

  • कोणती एखादी शैली, ज्यात काम करण्याची इच्छा होती आणि त्यात तुम्ही आतापर्यंत काम केले नाही?

मी स्वत:ला पडद्यावर चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेत पाहू इच्छिते. माझे स्वप्न आहे. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. ज्या प्रकारे त्यांची पडद्यावर हजेरी असायची, मला स्वत:ला तसं पाहायचं आहे. कधी, कसं आणि केव्हा करेन याचे सध्या कोणतेही उत्तर नाही. मात्र, मला संधी मिळाली तर नक्कीच मी त्यांच्या भूमिकेसाठी स्वत:ला वाहून घेईन.

  • तुझ्या आगामी प्रोजेक्टबाबत काही सांग.

मी नुकताच निर्माते शीर्ष गुहा ठाकूर दिग्दर्शित एक चित्रपट पूर्ण केला. तो सेंडिल राममूर्ती, प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूजसोबत एक रिलेशनशिपवर आधारित आहे. तसेच अनू मेननचा आगामी चित्रपट सुरू होत आहे. तो एक थ्रिलर आहे. त्यानंतर काय करेन हे अद्याप ठरवले नाही.

बातम्या आणखी आहेत...