आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाच्या काळात शूटिंग:तीन महिन्यांनंतर कामावर परतली विद्या बालन, सेटवर योग्य ती काळजी घेताना दिसले क्रू मेंबर्स

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्या बालन लवकरच गणित तज्ज्ञ शकुंतला देवीवरील बायोपिकमध्ये दिसणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व चित्रपट आणि जाहिरातींच्या शूटिंगवर बंदी होती. तीन महिन्यांनंतर अनलॉक झाल्यावर सर्व कलाकार कामावर परतत आहेत. अदा शर्मा, तापसी पन्नू,  आयुष्मान खुरानानंतर आता विद्या बालननेही शुटिंग सुरू केले आहे. सेटवरील काही छायाचित्रेही समोर आली आहेत, जिथे प्रत्येक क्रू मेंबर संपूर्ण सावधगिरीने शूट करताना दिसत आहे.

विद्याने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शूटिंगची झलक शेअर केली. यातील काही छायाचित्रे विद्याच्या व्हॅनिटी व्हॅनची आहेत तर काही शॉट देतानाची आहेत. विद्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचे केस स्लो मोशनमध्ये उडताना दिसत आहेत. हे शूटिंग एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सेटवर मेकअप करताना विद्या बालन.

सेट आणि व्हॅनिटी मधील प्रत्येक जण मास्क आणि पीपीई किट घालून दिसत आहे. त्याचबरोबर ब-याच दिवसानंतर पुन्हा शूटिंग सुरू झाल्याने विद्यादेखील आनंदी आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे, विद्या बालन लवकरच गणित तज्ज्ञ शकुंतला देवीवरील बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यापूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता पण सद्यस्थिती पाहता अॅमेझॉन प्राइमवर तो 31 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

0