आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनची व्यथा:विद्या म्हणाली - एकेकाळी माझे वाढलेले वजन हा एक राष्ट्रीय मुद्दा बनला होता, बरेच दिवस मी माझ्या शरीराचा तिरस्कार केला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1995 पासून अभिनय क्षेत्रात आहे कार्यरत

अभिनेत्री विद्या बालन हिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे बराच टीकेचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत तिने आपली व्यथा मांडली आणि तिचे वाढलेले वजन हा कशाप्रकारे एक राष्ट्रीय मुद्दा बनला होता त्याविषयी सांगितले. विद्या म्हणाली, 'मी जे केले त्यामधून जाणे माझ्यासाठी महत्वाचे होते. या सगळ्या गोष्टी सार्वजनिक होत्या आणि अपमानास्पद होत्या. माझ्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती चित्रपटसृष्टीत नाही. त्यावेळी मला हे सगळे काही दिवसांत थांबेल हे सांगणाे कोणी नव्हते. माझ्या वजनाचा मुद्दा हा एक राष्ट्रीय मुद्दा बनला होता,' असे विद्या म्हणाली.

'बरेच दिवस मी माझ्या शरीराचा तिरस्कार केला'
ई-टाईम्सशी बोलताना विद्या पुढे म्हणाली, "मी सुरुवातीपासूनच एक लठ्ठ मुलगी आहे. माझे वाढते वजन मला त्रास देत नाही, असे मी म्हणणार नाही. परंतु मी आता खूप पुढे आली आहे. मला आधीपासून हार्मोनल बॅलेन्सची समस्या आहे. बरेच दिवस मी माझ्या शरीराचा तिरस्कार केला. मला असे वाटले की माझे शरीर मला धोका देत आहे. ज्या दिवशी माझ्यावर सर्वात चांगले दिसण्याचा दबाव होता, तेव्हाच माझे वजन वाढत होते. हे पाहून मी आणखी नैराश्यात जात होते. मात्र शेवटी मी ही गोष्ट मान्य केली. पण यासाठी मला बराच वेळ लागला," असे विद्याने सांगितले.

बॉडी शेमिंगच्या मुद्याला कशी सामोरे गेली?
बॉडी शेमिंगला कसे हाताळले असा प्रश्न विद्याला विचारला असता, तिचे उत्तर होते, "मी स्वतःवर प्रेम करायला आणि ते आहे तसे स्वीकारण्यास सुरुवात केली. तेव्हा लोकदेखील मला स्वीकारू लागले. त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माझे कौतुक करण्यास सुरुवात केली. कालांतराने मी हे कबूल केले की माझे शरीर ही अशी गोष्ट आहे, ज्याने मला जिवंत ठेवले. कारण ज्या दिवशी शरीर काम करणे थांबवेल, त्या दिवशी मी कोठेही जाऊ शकणार नाही, हे मी मान्य केले. म्हणून मी माझ्या शरीराची खूप आभारी आहे," असे विद्या म्हणाली.

1995 पासून अभिनय क्षेत्रात आहे कार्यरत
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात 'हम पांच' (1995) या टीव्ही मालिकेद्वारे केली होती. तिने 2005 मध्ये 'परिणीता' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'लगे रहो मुन्नाभाई' (2006), 'गुरु' (2007), 'पा' (2009), 'द डर्टी पिक्चर' (2011), 'कहानी' (2012), 'हमारी अधुरी कहानी' (2015), 'बेगम जान' (2017) आणि 'मिशन मंगल' (2019) सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. तिचा आगामी चित्रपट 'शेरनी' हा असून तो यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...