आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:विद्या बालन म्हणते - 'जे जगात चुकीचे काम करत आहेत, त्यांना गोळी मारायची इच्छा आहे'; विक्रम मल्होत्रा म्हणाले...

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विक्रम म्हणाले, विद्यासाठी उच्च दर्जाची स्क्रिप्ट आतापर्यंत आली नाही...

एखादा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता यांच्यातील नाते अनेक चित्रपटांपर्यंत टिकते. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. उदाहरणार्थ, अमिताभ बच्चन-मनमोहन देसाई, सुभाष घई-संजय दत्त, हिरानी-संजय दत्त. आता विक्रम मल्होत्रा-विद्या बालनच्या रुपात दिसत आहे. दोघांनी 'शकुंतला देवी' आणि 'शेरनी'मध्ये एकत्र काम केले आहे. आता नुकताच दोघांनी 'जलसा' हा चित्रपट आणला आहे. दिव्य मराठीशी केलेल्या खास बातचीतमध्ये विद्या आणि विक्रम यांनी त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नाते आणि जलसा चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • तुम्ही दोघे पुन्हा एकत्र काम करत आहात ?

विक्रम : विद्याच्या नावातच विद्या आहे म्हणजेच सरस्वती, तिची साधना केल्यास लक्ष्मी प्राप्त होते. हे गुपित मी जगाजाहीर केले. सरस्वतीच्या आराधनामुळे आमच्या एबंडंशिया कंपनीत लक्ष्मी येत आहेत. आमच्या एकत्र काम करण्याचे हेच गुपित आहे. आमची कंपनी एबंडंशियाचे नावदेखील रोमन देवतावर आधारित आहे, ती संपत्तीची देवी आहे.

विद्या : माझ्या आईचे नाव सरस्वती आहे आणि माझ्या मावशीचे नाव लक्ष्मी आहे. आमचे एकत्र काम करण्याचे हेदेखील एक कारण असू शकते.

  • माया मेनन पात्राबद्दल विद्याचे काय मत होते?

विद्या : आपण स्वत:च चूक किंवा बरोबर असल्याचे ठरवत असतो. जेव्हा स्वत:वर येते तेव्हा कळते. एखाद्या परिस्थिती आपण कशी प्रतिक्रिया देतो त्यामुळे मी कुणाचेही निरीक्षण करत करत फिरत नाही.

  • सिल्क स्मितासारखे असे कोणते पात्र आहे, ज्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागली ?

विद्या : ‘जलसा’मधील मायाचे पात्र. यातील सत्य-असत्याचा संघर्ष समजून घेणे, तसेच जास्त न बोलता व्यक्त होणे अवघड असते. बरं, प्रकल्प आणि पात्रांमध्ये सुरेख संतुलन गरजेचे असते. त्याचप्रमाणे ‘शकुंतला देवी’ हासुद्धा खूप आव्हानात्मक प्रकल्प होता.

  • विक्रमच्या कोणत्या प्रोजेक्ट्सला आतापर्यंत नकार दिला ?

विद्या : खरं तर, बऱ्याचदा असे झाले. मला त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स दिले मात्र मी नकार दिला तसेच मी त्यांना काही कहाण्या पाठवल्या होत्या. त्यावर त्यांनी काही विचार केला नाही. मात्र पार्टनरशिपमध्ये काम चांगले आहे. त्यात दोघांचा विश्वास आहे.

  • मागील चित्रपटातील कोणते दृश्य पुन्हा करशील ?

विद्या : ‘कहानी’मधील ते दृश्य ज्यात माझे पात्र विद्या बागची खलनायक, मिलन दामजीला गोळी मारते. असे बरेच लोक आहेत, जे जगात चुकीचे काम करत आहेत, त्यांना गोळी मारायची इच्छा आहे.

  • पुढे किती चित्रपटांसाठी करार करणार आहात?

विक्रम : जोपर्यंत आमचे नाव बदलणार नाहीत तोपर्यंत हा करार राहणार आहे. विद्यासोबत काम करून पूर्ण टीम आनंदी राहते, काम करण्याचा भरपूर आनंद मिळतो. ‘वी 2’चे संयोजन सर्वात उत्कृष्ट आहे, असे मला वाटते.

  • विद्यासाठी ओटीटीवर काही बनवणार का?

विक्रम : विद्याला सांगण्यासाठी माझ्याकडे अजून बरेच चित्रपट आहेत. त्यावरच सध्या काम करायचे आहे. ओटीटीच्या बोलायचं झालं तर विद्यासाठी उच्च दर्जाची एकही स्क्रिप्ट माझ्याकडे आली नाही जो मी विद्यापर्यंत घेऊन जाईन.

  • ‘जलसा’नंतर पुन्हा विद्याला ओटीटीवर बघता येईल का ?

विद्या : सध्या तर मी चित्रपटावरच फोकस करत आहे. कारण डिजिटलसाठी आलेल्या सर्व स्क्रिप्ट्स मी वाचल्या पण यापैकी एखादी करावी, अशी इच्छा झाली नाही. वेब शो पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागतो. आता मला कळलं, मी आधी हो म्हणाले, नंतर खूप मजा नाही तर? मी बराच काळ अडकून पडेल. पण कधी ना कधी नक्कीच पदार्पण करेल, याची खात्री आहे.

बातम्या आणखी आहेत...