आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन बदल:विद्या बालन स्टारर 'शकुंतला देवी'चाही होणार डिजिटल प्रीमियर, प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी मे महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

लॉकडाऊनच्या दरम्यान विद्या बालन स्टारर 'शकुंतला देवी' हा चित्रपट आता थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या आणि चित्रपटाशी संबंधित इतर लोकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. मात्र अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

विद्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे सांगताना मला आनंद होतोय, तुम्ही लवकरच आपल्या प्रियजनांसोबत प्राइम व्हिडिओवर' शकुंतला देवी' बघू शकणार आहात. अशा अभूतपूर्व काळातही आम्ही तुमचे मनोरंजन करू शकू, याबद्दल आम्ही उत्साहित आहोत #WorldPremierOnPrime # शकुंतलादेवीऑनप्राइम'

  • सान्या मल्होत्रा आणि अमित साधही दिसणार आहेत

मानवी कम्प्युटरम्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात विद्यासह सान्या मल्होत्रा ​​आणि अमित साधदेखील दिसणार आहेत. सान्या शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारत आहे, तर अमित शकुंतला देवी यांचा जावई अजय यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे  शूटिंग गेल्या वर्षी लंडनमध्ये सुरू झाले होते.

  • कोण होत्या शकुंतला देवी?

शकुंतला देवी एक गणितज्ञ होत्या. गणितावरच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचे नाव 1982 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. त्यांनी नॉवेल, गणितावर आधारित पुस्तके, पजल आणि एस्ट्रोलॉजीवर अनेक पुस्तकेदेखील लिहिली. मात्र त्यांचे 'द वर्ल्ड ऑफ होमोसेक्सुअल्स' या पुस्तकाला भारतात होमो सेक्युलिटीवर आधारित अभ्यासासाठी उत्तम माहिती पुस्तक म्हणून ओळखले जाते. 

  • वडील सर्कसमध्ये काम करत होते

शकुंतला देवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षांच्या शकुंतलाला कार्ड्स ट्रिक शिकवताना त्यांनी आपल्या मुलीची नंबर लक्षात ठेवण्याची क्षमता ओळखली आणि  शकुंतलाच्या प्रतिभेच्या बळावर रोड शो सुरू करण्यासाठी सर्कस सोडली. तिथे ते शकुंतलाची मोजण्याची क्षमता दाखवत असे. शकुंतला यांनी यासाठी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी म्हैसूर विद्यापीठात आपली अंकगणित क्षमता दर्शविली. या सर्व कथा चित्रपटात दाखवल्या जातील. त्यांना 'ह्युमन कम्प्यूटर' असे नाव देण्यात आले.

  • महिलांनी मिळून तयार केलेला चित्रपट

हा हिंदी  सिनेमातला पहिला असा सिनेमा आहे, ज्यात दिग्दर्शनापासून ते लेखन, मुख्य भूमिकेपर्यंत महिलांनी काम केले आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून  त्यांनी नयनिका महतानी यांच्यासह पटकथा लिहिली. चित्रपटाचे संवाद लेखन इशिता मोईत्रांनी केले आहे.  

  • 'गुलाबो-सीताबो'चा डिजिटल प्रीमियर देखील असेल

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर 'गुलाबो-सीताबो'चा डिजिटल प्रीमियर होणार असल्याची घोषणा नुकतीच झाली आहे. 12 जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा  चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर 'शकुंतला देवी' हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर  रिलीज होणार असला तरी अजुन त्याची तारीख जाहिर केलेली नाही.  

गेल्या वर्षी मे महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर विद्याने हे पोस्ट केले…

सिनेमात सान्याचा लूक असा असेल

या चित्रपटात सान्या शकुंतला देवीची मुलगी अनुपमाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...