आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाऊंसमेंट ऑफ द डे:विद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सिनेमात विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

विद्या बालन स्टारर बहुप्रतिक्षित 'शेरनी' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाचा ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात येणार आहे. आपल्या शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन असून शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेन्मेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे, ताज्या दमाची आणि गुंतवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही 'शेरनी'साठी उत्साही आहोत. ”

अबंडनतिया एंटरटेन्मेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले, “2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेन्मेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे.”

टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याचा मला आनंद आहे.”

बातम्या आणखी आहेत...