आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेरनी'चा ट्रेलर रिलीज:फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत आहे विद्या बालन, 18 जूनला 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय चित्रपट

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत आणि 240 हून अधिक देशात 18 जून पासून हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे.

विद्या बालन स्टारर 'शेरनी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. जगातील 240 हून अधिक देशांमध्ये 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून ती एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत दिसतेय. टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. व्यंगावर बोट ठेवणाऱ्या आपल्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहे.

आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते.

चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल विद्या बालन म्हणाली, “मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकले आणि ते मला भावले. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली चित्रपटातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे.”

या वेगळ्या पद्धतीच्या मनोरंजक कलाकृतीबद्दल बोलताना दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, “शेरनी’च्या कथानकाला काटेरी पैलू आहेत. या निमित्ताने मनुष्य आणि पशू यांच्यातील संघर्षाची जटिलतेचा वेध घेण्यात आला आहे. विद्या बालनने मीड-लेव्हल फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारली असून अडथळे आणि तणावपूर्ण स्थितीतही ती आपल्या टीम व स्थानिकांसह पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करत असते. विद्या, आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर शेरनी रिलीज होणार असल्याने ही कथा भारत आणि जगभर विस्तृत तसेच वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदतीची ठरेल.”

बातम्या आणखी आहेत...