आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपडेट:अ‍ॅमेझॉन प्राइमवर आता 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार विद्या बालनचा चित्रपट 'शकुंतला देवी', 'गुलाबो सीताबो'मुळे पुढे ढकलण्यात आले प्रदर्शन

किरण जैन, मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ‍ॅमेझॉन प्राइमने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुलाबो सीताबो'  या चित्रपटानंतर आता विद्या बालनचा 'शकुंतला देवी' हा चित्रपटदेखील लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अलीकडे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे.  या चरित्रात्मक चित्रपटात विद्या बालनने मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणा-या गणितज्ञ शकुंतला देवीची भूमिका साकारली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे, "नियोजनानुसार, गुलाबो सीताबोच्या रिलीजच्या काही दिवसानंतरच विद्या बालनचा शकुंतला देवी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. 'गुलाबो सीताबो'च्या लोकप्रियतेवर याचा परिणाम होऊ नये, यासठी अ‍ॅमेझॉनने रिलीजची तारीख वाढविली आहे. आता 30 जुलै रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.'

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विद्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन हा चित्रपट 8 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते, परंतु तसे होऊ शकले नाही. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील थिएटर बंद पडल्यामुळे बर्‍याच चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 13 मार्चपासून चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. हा आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता पण सद्यस्थिती लक्षात घेता निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 

सान्या मल्होत्रा ​​आणि अमित साधही दिसणार आहेत

मानवी कम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात विद्यासह सान्या मल्होत्रा ​​आणि अमित साधदेखील दिसणार आहेत. सान्या शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारत आहे, तर अमित शकुंतला देवी यांचा जावई अजय यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी लंडनमध्ये सुरू झाले होते.

कोण होत्या शकुंतला देवी?

शकुंतला देवी एक गणितज्ञ होत्या. गणितावरच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचे नाव 1982 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. त्यांनी नॉवेल, गणितावर आधारित पुस्तके, पजल आणि एस्ट्रोलॉजीवर अनेक पुस्तकेदेखील लिहिली. मात्र त्यांचे 'द वर्ल्ड ऑफ होमोसेक्सुअल्स' या पुस्तकाला भारतात होमो सेक्युलिटीवर आधारित अभ्यासासाठी उत्तम माहिती पुस्तक म्हणून ओळखले जाते.

महिलांनी मिळून तयार केलेला चित्रपट

हा हिंदी सिनेमातला पहिला असा सिनेमा आहे, ज्यात दिग्दर्शनापासून ते लेखन, मुख्य भूमिकेपर्यंत महिलांनी काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून त्यांनी नयनिका महतानी यांच्यासह पटकथा लिहिली. चित्रपटाचे संवाद लेखन इशिता मोईत्रांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...