आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर 2021:विद्या बालनची 'नटखट' ही शॉर्ट फिल्म ऑस्करच्या शर्यतीत, आनंद व्यक्त करताना विद्या म्हणाली -  ही खरंच फार छान गोष्ट घडली

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 च्या ऑस्करमध्ये ‘नटखट’ची निवड करण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री विद्या बालन हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा विद्या बालनच्या ‘नटखट’ या शॉर्ट फिल्मची वर्णी लागली आहे. स्वतः विद्याने ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'गेल्या एका वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. मात्र, या काळात आमच्या शॉर्ट फिल्मची ऑस्करसाठी निवड करण्यात आली ही खरंच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाली', असे विद्याने म्हटले आहे. निर्माती म्हणून विद्याची ही पहिलीच शॉर्टफिल्म आहे.

RSVP मुव्हीजनेही यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 'विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नटखट’ या लघुपटाला ऑस्कर 2021 मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे,' अशी पोस्ट RSVPने केली आहे.

काय आहे नटखटची कथा?
'नटखट' या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक शान व्यास हे आहेत. ही शॉर्टफिल्म पितृसत्ताक आणि नकारात्मक पुरुषत्ता यांसारख्या मुद्द्यांवर बेतलेली आहे. यासोबतच अनेक संवेदनशील मुद्द्यांवर ही शॉर्टफिल्म भाष्य करताना दिसून येते. लिंगभेद, बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचार यावर ही प्रकाश टाकताना पहायला मिळते. 33 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

बातम्या आणखी आहेत...