आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानच्या भूमिकेने सजलेल्या ‘चक दे इंडिया’मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदेची वेब सीरिज ‘बामिनी अँड बॉयज’ 7 मे रोजी प्रसारित झाली. या सीरिजमध्ये विद्या एका बोल्ड भूमिकेत दिसली. एका खास बातचीतमध्ये विद्याने आमच्या प्रतिनिधी किरण जैनसोबत सीरिज आणि पात्राविषयी चर्चा केली...
'चक दे इंडिया’ चित्रपटाला जवळजवळ 14 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाने मला वेगळी ओळख मिळवून दिली. मात्र त्या चित्रपटानंतर मला त्याच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या हाेत्या. गंभीर भूमिकाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. त्या काळात काही चित्रपट केले मात्र टायटल रोल ऑफर झाल्या नाहीत. पोस्टरमध्येही जागा मिळत नव्हती. ज्या प्रकारे मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छित होते तसे झाले नाही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर मला माझ्या आवडीचे काम मिळत आहे. या माध्यमांनी मला माझ्या अभिनयाची प्रतिभा वाढवण्याची संधी दिली. गेल्या एका वर्षापासून जवळजवळ 6 प्रोजेक्टचा भाग राहिले आहे. आता आपल्या कामाने समाधानी आहे.
‘बामिनी अँड बॉयज'मध्ये मी ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. तीन तरुण मुलं माझ्या घरात भाड्याने राहतात. ते सर्व मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत प्रेक्षक मला गंभीर भूमिकेत पाहत आले आहेत. मला स्वतः यातून बाहेर यायचे होते, परंतु सामान्य भारतीय मुलीव्यतिरिक्त मला कोणतीही भूमिका मिळत नव्हती. शेवटी जेव्हा ही मालिका ऑफर झाली तेव्हा मी नकार देऊ शकले नाही.
सोशल मीडियामुळेच मला ही भूमिका मिळाली आहे. आता यापुढे वेगवेगळ्या भूमिका करायला प्राधान्य देईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.