आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुव्ही रिव्ह्यू:IB71 मध्ये अनुपम खेर-विद्युत जामवाल यांचा अभिनय पाहण्यासारखा, चित्रपटात सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस

अमित कर्ण23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकार: विद्युत जामवाल, अनुपम खेर, विशाल जेठवा, दलीप ताहिल, निहारिका रायजादा, डॅनी सुरा, सुव्रत जोशी

दिग्दर्शक: संकल्प रेड्डी, ली व्हिटेकर

IB71 हा चित्रपट 12 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटाद्वारे विद्युत जामवालने निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. चित्रपटाचे कथानक 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सुरू असलेल्या प्रतिष्ठित मोहिमेशी संबंधित आहे. हा चित्रपट देशाच्या गुप्तहेरांच्या धाडसावर आणि शौर्यावर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकल्प रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. निर्मात्यांनी सांगितल्यानुसार, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

कसा आहे चित्रपट...

काय आहे चित्रपटाची कथा ?

चित्रपटाची पार्श्वभूमी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानची आहे. चित्रपटाची कथा दिल्ली, शिमला, काश्मीर, पाकिस्तान आणि सध्याच्या बांगलादेशमध्ये घडते.

या युद्धानंतरच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. भारताकडून सूड घेण्यासाठी पश्चिम पाकिस्तान हल्ल्याची योजना आखत असल्याची कल्पना भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना नसते. भारताला पाकिस्तानच्या कारस्थानाची कल्पना येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. असे असूनही, भारताच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी - आयबी आपला जीव धोक्यात घालून अशी माहिती मिळवतात ज्यामुळे परिस्थितीच बदलते.

कलाकारांचा अभिनय कसा आहे?
या चित्रपटात विद्युत जामवालने देव नावाच्या गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एनएस अवस्थींच्या भूमिकेत अनुपम खेर टीमचे लीडर आहेत. पूर्व पाकिस्तानचे ISI चीफ अफसल आगा आणि आर्मी चीफ अब्दुल हमीद खान हे भारताविरुद्ध हल्ल्याची योजना आखत असतात आणि त्यांना थांबवले नाही तर भारताचे खूप नुकसान होऊ शकते. याच षड्यंत्राखाली पाकिस्तान आझाद काश्मीरची मागणी करणाऱ्या तरुणांचाही वापर करत असतो.

भारतीय तुरुंगात कैद असलेल्या आपल्या संघटनेच्या लोकांच्या सुटकेच्या बदल्यात ते विमान हायजॅक करण्याची योजना आखतात. उलट देव या लोकांच्या मदतीने 30 जणांच्या टीमसह पाकिस्तानात पोहोचतो. तिथे देव सीक्रेट माहिती गोळा करत परिस्थिती बदलतो.

चित्रपटात लिखाणाची उणीव असूनही हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. विद्युत जामवाल आणि त्याच्या टीमच्या हेतूतील प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो. विशाल जेठवाने कासिम कुरेशीची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली आहे. विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांनीही चांगला अभिनय केला आहे. ISI चीफ अफजल आगाच्या भूमिकेत अश्व्थ भट्टने चांगला अभिनय केला आहे.

मध्यंतरानंतर चित्रपटाच्या कथानकाला वेग येतो. एकाच वेळी 30 भारतीय गुप्तचर अधिकारी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय प्रमुखांच्या डोळ्यात धूळफेक करून पाकिस्तानात पोहोचतात. येथे देवचा अ‍ॅक्शनसह माइंड गेमही पाहायला मिळतो.

चित्रपट कसा आहे?
चित्रपटाचे एडिटिंग कमालीचे आहे. यामुळे कथा वेगाने पुढे सरकत आहे, पण काही ठिकाणी सीन रिपीट झाल्याचे दिसते.तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भूमिका साकारणारा हॉबी धालीवाल चित्रपटात आपली छाप सोडू शकलेला नाही. तसेच सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाच्या पटकथेवर अधिक मेहनत घ्यायला हवी होती. चित्रपटात क्लोज शॉट आणि वाइड अँगल शॉटचाही योग्य वापर करण्यात आला आहे.