आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खुदा हाफिज 2’:विद्युतने स्वत: डिझाइन केले अ‍ॅक्शन सीन्स, इजिप्तच्या पिरॅमिड्सजवळ चित्रित झाले पाठलागाचे प्रसंग

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर चित्रित पहिला हिंदी चित्रपट

विद्युत जामवाल स्टारर ‘खुदा हाफिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक फारूख कबीर एक स्ट्रॉन्ग फ्रँचायजचे रूप देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचा दुसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. विद्युतच्या नेहमीच्याच साहस दृश्यांची दुसऱ्या भागातही रेलचेल आहे. चित्रपटाचा सेट इजिप्तमध्ये असून, आपल्या मुलीच्या शोधासाठी हीरो तेथे गेला आहे. चित्रीकरणादरम्यान निर्मात्यांना तेथे आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले. फारूखने विद्युतच्या भूमिकेचा नवा पैलू शेअर केला आहे. ते म्हणाले, विद्युत आता मेथड अ‍ॅक्टिंगची पद्धत अंगीकारत आहे. भूमिकेशी एकरूप होण्यासाठी तो सेटवर कठोर शिस्तीचे पालन करत आहे, विशेषत: त्याला जेव्हा शोकसंतप्त प्रसंग सादर करायचे असतात त्यावेळी तो कोणाशीही हाय, हॅलो पण करत नव्हता.’

फारूख आणि विद्युत यांनी दिग्दर्शक-अभिनेता या मूळ रूपातून बाहेर पडत आपासात मित्र आणि भावांसारखे नाते जपले. विद्युतच्या साहस दृश्यांमधील आव्हानांचाही फारूख उल्लेख करतात. ते म्हणतात, ‘लखनऊमध्ये विद्युतची अनक साहस दृश्ये चित्रीत झाला. तेथे कारागृहातील कैद्यांसोबतच्या हाणामारीच्या चित्रीकरणादरम्यान तो जखमी झाला. त्याने हातात खराखुरा वस्तरा घेऊन साहस दृश्यांचे चित्रीकरण केले. एवढेच नव्हे तर मोहर्रमच्या मातममध्ये वापरली जाणारी साखळी घेऊनही त्याने साहस दृश्ये दिली.’

या वेळी गाण्यांवरही काम झाले आहे
फारुख याला हार्डकोअर अ‍ॅक्शन चित्रपट मानत नाहीत. ते म्हणतात, ‘मागच्यासारखे यावेळीही चित्रपटातील गाण्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. चित्रपटात चार गाणी आहेत. गाण्यांच्या चित्रीकरमासाठी सहा महिने लागले. यावेळी संगीतकार मिथुन यांनी या चित्रपटातील एकच गाणे कंपोझ केले आहे, कारण एकाच गाण्याच्या चित्रीकरणावर तीन महिने काम करण्यात आले. एका गाण्यात तर श्रीराम आणि सीताजी यांची प्रेमकहाणी लिरिकली सेलिब्रेट करण्यात आली आहे.’

लखनऊमध्ये कारागृहातील कैद्यांसोबत हाणामारीच्या दृश्यांचे चित्रीकरण
दिगिदर्शक फारूख सागतात, ‘इजिप्तचे वातावरण आमच्यासाठी प्रतिकूल होते. ते यामुळे की आमच्या अ‍ॅक्शन दिग्दर्शकाला कोरोना झाला होता. त्यामुळे ते सिंगापूरमध्येच अडकून पडले. आमच्या डीओपीलाही कोरोना झाला होता. त्यामुळे निर्मात्यांचे पैसे संकटात सापडले होते. तथापि, आम्ही चित्रीकरणात अडथळे येऊ दिले नाहीत. आम्ही दोघेही परत आलो नाहीत. स्वत:च अ‍ॅक्शन आणि सिनेमॅटोग्राफीची बाजू सांभाळून शेड्यूल पूर्ण केले.

पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर चित्रित पहिला हिंदी चित्रपट

चित्रपटाच्या क्लयामॅक्सचे चित्रीकरण पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर पूर्ण केले. इजिप्तच्या पिरॅमिड्सच्या जवळच पाठलागाच्या प्रसंगांचेही चित्रीकरण झाले. पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणाला परवानगी मिळालेला हा पहिलाच हिंदी चित्रपट असावा.’

बातम्या आणखी आहेत...