आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:फेव्हरिझमवर विद्युत जामवाल म्हणाल - ‘काही लोकांनी प्रोत्साहन दिले नाही तरी माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही’

उमेश कुमार उपाध्याय3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड स्टार विद्युत जामवालचा नवा चित्रपट रिलीज होतोय. त्याने फेव्हरिझमवरही आपले मत मांडले.

बॉलिवूडचा नवा अॅक्शन स्टार विद्युत जामवालचा आगामा ‘यारा’ हा चित्रपट जी 5 वर 30 जुलै रोजी प्रदर्शित होतोय. याशिवाय 'खुदा हाफिज’ हा चित्रपटही त्याचा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे ‘10 पीपल यू डोंट वाँट मेस विथ’ या लिस्टमध्ये त्याचे नाव सामील झाले आहे. याचनिमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत...

  • ‘यारा’ चित्रपटातील भूमिकेसाठी कोणती विशेष तयारी केली?

- ‘यारा’ चित्रपटात चार मित्रांचा प्रवास दाखवला आहे. चौघांचीही बालपणापासून वयाच्या पन्नाशीपर्यंत मैत्री असते. यात आमची पात्रे पंचविशीपासून पन्नाशीपर्यंत दाखवायची होती. यासाठी मेहनत घ्यावी लागली. तरुणपणात सडपातळ होतो. नंतर अमित साधने साडेबारा किलो वजन वाढवले. याशिवाय चालण्या-बोलण्याची पद्धतही पन्नाशीनंतर बदलते. त्याचीही तयारी केली.

  • ‘खुदा हाफिज’बाबत काही सांगा.

- ‘खुदा हाफिज’ 14 ऑगस्टला रिलीज होईल. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. लग्नानंतर दोघांचीही नोकरी सुटलेल्या जोडप्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. यानंतर नोकरीसाठी दोघेही परदेशात जातात आणि पहिल्याच दिवशी पत्नी गायब होते. त्यानंतर पत्नीला शोधण्यासाठी पतीला काय काय करावे लागते ते या चित्रपटात दाखवले आहे. दिग्दर्शक फारुक कबीर यांनी वृत्तपत्रात ही बातमी वाचली आणि मग त्या मध्यवर्ती संकल्पनेवर हा चित्रपट तयार केला.

  • याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घोषणेच्या वेळी तुम्हाला सहभागी करून न घेण्याचे कारण काय होते?

- कोण काय करते, याचे कारण आपल्याला माहीत नसते. त्यामुळे कुणी काय विचार केला, हे मी सांगू शकणार नाही. मला जे वाटले ते मी ट्विट करून सांगितले. मला संपूर्ण देशाने उत्तर दिले आणि माझ्याबद्दल प्रेमही दर्शवले.

  • ...परंतु मोठ्या बॅनरमध्ये संधी मिळत नाही किंवा दिली जात नाही, याबाबत काय विचार करता?

- मी विचार करत नाही, कृती करतो. जगात जे विचार करतात ते गोंधळलेले असतात. ज्यांनी मला काम दिले त्यांचे चित्रपट मी केले. कोण मोठा, कोण छोटा असा विचार कधीही केला नाही. ‘जंगली’ चित्रपटासाठी मी जगातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम केले. हा प्रश्न चांगला आहे, पण मला लागू होत नाही, कारण छोटा-मोठा असा विचार मी करत नाही. तुमच्याशी चांगले वागणारा खूप मोठा माणूस आणि जो चांगले वागत नाही तो काहीच नाही.

  • कमांडो सीरिजसह अनेक हिट चित्रपट तुम्ही दिले. चित्रपटांतील अॅक्शनही स्वत:च करता. तरीही मोठ्या बॅनरचा चित्रपट अद्याप तुम्हाला मिळाला नाही. याचे कारण फेव्हरिझम, नेपोटिझम आहे की आणखी काही?

- एक दरवाजा तुमच्यासाठी बंद झाला तर अनेक दरवाजे उघडतात. तुमच्या सभोवतालचे लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नसतील तर त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ नये. आज जगातील टॉप 10 मध्ये माझे नाव आले आहे. भारताचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे मला निवडणाऱ्या छोट्या-मोठ्या सगळ्या निर्मात्यांबरोबर मी काम करीन. मला आतापर्यंत ज्यांनी काम दिले ते स्वत:हून दिले, यासाठी मी भाग्यवान समजतो. कुणीही मोठे-छोटे असत नाही.

  • ‘10 पीपल यू डोंट वाँट मेस विथ’ या लिस्टमध्ये तुमचे नाव आले आहे. एवढ्या उंचीवर पोहोचल्यावर तुमची प्रतिक्रिया काय?

- खूप आनंद वाटतो. आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवण्याएवढा आनंद तुमच्या चित्रपटाची 500 कोटींची कमाई झाली तरी मिळू शकत नाही. इतका स्टारडम मी एन्जॉय केला. पण पुरस्कार मिळाल्यावर आनंद वाटतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर माझे नाव जोडले जात आहे. जगातील सामर्थ्यवान व्यक्तींपैकी ते एक आहेत. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

  • कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना काय टिप्स द्याल?

- फक्त मेहनत करा, आणखी काही टिप्स नाहीत. झोपत असाल तर इतके झोपा की पुन्हा म्हणू नका की झोप आली नाही आणि जागे असाल तर इतके जागा की चांगली झोप यावी. कोरोना काळात तुम्ही करू इच्छित असलेल्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, असे मला वाटते. घरी बसूनही खूप काही केले जाऊ शकते. केवळ बॉडी बिल्डिंगच नाही, तर मानसिक स्थितीही मजबूत करा. पुस्तके वाचा, वेगवेगळ्या गोष्टी पाहा. आवडते ते सर्वकाही करा.