आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युतचा नवा चित्रपट:इजिप्तवर आधारित 'खुदा हाफिज 2’मध्ये क्रूरपणे मारहाण करताना दिसणार विद्युत जामवाल, मुंबईत झाले एका दिवसाचे शूटिंग

अमित कर्ण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 ऑगस्टपासून लखनऊमध्ये होणार दोन महिन्यांचे शेड्यूल

गुरुवारी विद्युत जांबवालने मुंबईत ‘खुदा हाफिज 2’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक फारुख कबीरने सांगितले, आम्ही मुुंबईत या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा आमच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. मुंबईत आम्ही फक्त एका दिवसाचे शूटिंग करणार आहोत. यानंतर 3 ऑगस्टनंतर लखनऊमध्ये दोन महिन्यांचे शेड्यूल आहे. त्यानंतर पूर्ण चित्रपटाची टीम कलाकारांसह ऑक्टोबरमध्ये शूटिंगसाठी इजिप्त जाणार आहे. तेथे 15 दिवसांचे शेड्यूल होणार आहे. निर्मात्यांची इच्छा यात इंटेन्स प्रेमकथा दाखवण्याची आहे.

पहिल्या भागाच्या पुढची कथा असेल
निमार्त्यांनी या चित्रपटाचे शीर्षक 'खुदा हाफिज: चॅप्टर 2 अग्निपरीक्षा’ असे ठेवले आहे. पहिला भाग जेथे संपतो तेथुन दुसरा भाग सुरू होणार आहे. चित्रपटात मुख्य पात्राच्या जीवनात अग्निपरीक्षेची वेळ दाखवली जाणार आहे. येथे हिरो समोर आपल्या पत्नीला स्वीकारण्याचे आव्हान असते, तिचे खाडी देश नोमानमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका गिरोहाने कैद केलेले असते. गेल्या भागात पात्र जरा सामान्य ठेवले होते, मात्र या भागात विद्यतचे पात्र क्रूरपणे मारहाण करताना दिसणार आहे.

दीड महिन्यापासून सुरू होते कथावाचन
निर्मात्यांनी सांगितले, गुरुवारपासून शूटिंग सुरू करण्यासाठी सर्वच कलाकार गेल्या दीड महिन्यापासून दिग्दर्शकांसोबत कथावाचन करत होते. मुंबईत एकाच दिवसाचे शूटिंग होते त्यामुळे येथे बायोबबल क्रिएट करण्याची गरज पडली नाही. मात्र सर्वांचे आरटीपीसीआर तपासणी झाली. सेटवर कोविड नियमांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. लखनऊ आणि इजिप्तमध्ये बायोबबलची व्यवस्था केली जाईल. ऑक्टोबरपर्यंत इजिप्तसाठी आंतरराष्ट्रीय नियमात काही बदल होतोय का ते पाहावे लागेल. कारण शूटिंग तर आम्ही तेथेच करू.

राजेश आणि शिबाही महत्त्वाच्या भूमिकेत
दुसऱ्या भागात निर्मात्यांनी मुख्य भूमिकेतील जोडी सोडून सर्वच नवीन कलाकार घेतले आहेत. मुख्य भूमिकेतील जोडीमध्ये विद्युतसोबत शिवलेका ओबेरॉय दिसणार आहेत. तर नवीन कलाकारांमध्ये राजेश तेलंग, शिबा चड्ढा, रुखसार रहमान आणि दिब्येंदू भट्टाचार्यची एंट्री होणार आहे.