आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Vijay Devarkonda Wear 199 R Slippers: Yami Gautam Wore A 33 Year Old Sari In Her Wedding, Salman's T Shirt Cost Rs 700 And Shraddha's Top Was Rs 499

विजय देवरकोंडाची 199 रुपयांची चप्पल:यामीने लग्नात नेसली होती 33 वर्षे जुनी साडी, सलमानच्या टी-शर्टची किंमत 700

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा त्यांच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच त्यांचा एक प्रमोशनल व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडाने 199 रुपये किंमतीची चप्पल घालून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. साऊथ स्टारचा हा डाउन टू अर्थ दृष्टिकोन लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा तोच कार्यक्रम होता, ज्यामध्ये रणवीर सिंग 2 लाख 28 हजार किमतीचे जॅकेट आणि 38000 रुपयांची पँट घालून पोहोचला होता. इव्हेंटमध्ये रणवीरने स्वतः विजय देवरकोंडाची चप्पलवरुन खिल्ली उडवली होती, चाहते मात्र विजयचा हा सिंपल लूक खूप पसंत करत आहेत. विजय व्यतिरिक्त असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा आहेत जे स्वस्त कपड्यांमध्ये पब्लिकली हजेरी लावून चर्चेत आले आहेत-

धनुष हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमियरला लुंगी घालून पोहोचला होता

अभिनेता धनुष लवकरच 'द ग्रेम मॅन' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच नेटफ्लिक्सने मुंबईत या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित केला होता, ज्याच्या रेड कार्पेटला रुसो ब्रदरसह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या प्रीमियरमध्ये धनुष पांढऱ्या कुर्ता आणि लुंगीमध्ये आला होता. धनुषने घातलेल्या लुंगीची ऑनलाइन किंमत फक्त 700 ते 1000 रुपये आहे. हॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पारंपरिक अवतारातील धनुषचा फोटो समोर येताच चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचे कौतुक केले होते.

राजकुमार रावने वाढदिवशी स्वस्त शर्ट परिधान केला होता

राजकुमार रावने 2018 साली वाढदिवशी केवळ 1400 रुपयांचा शर्ट परिधान केला होता. राजकुमार इंडस्ट्रीतील सर्वात साधा दिसणारा आणि डाउन टू अर्थ सेलेब्सपैकी एक आहे.

यामी गौतमने लग्नात नेसली होती 33 वर्षे जुनी साडी

2021 मध्ये यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. यामीने तिचे लग्न अतिशय साधेपणाने केले. यामीने लग्नात आईची 33 वर्षे जुनी साडी नेसली होती आणि स्वतः मेकअप केला होता. मोजक्या लोकांमध्ये झालेले हे डाउन-टू-अर्थ लग्न खूप चर्चेत होते.

सारा अली खानने घातला होता स्वस्त टी-शर्ट

'अतरंगी रे' फेम अभिनेत्री सारा अली खान हिच्या डाऊन टू अर्थ स्वभावाचे खूप कौतुक केले जाते. सारा अनेकदा तिच्या वर्कआउट सेशनमध्ये सामान्य कपड्यांमध्ये पोहोचते. काही दिवसांपूर्वी साराने पिवळा क्रॉप टॉप घातला होता. हे टॉप यूएस पोलो असाइनचे होते, ज्याची किंमत 12 डॉलर म्हणजेच 949 रुपये आहे.

अनेकवेळा एकाच पॅटर्नच्या टी-शर्टमध्ये दिसतो सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची ब्लॅक टी-शर्ट ही पहिली पसंती आहे, अनेकदा तो ब्लॅक टीशर्टमध्ये दिसतो. याशिवाय तो त्याच्या बीइंग ह्युमन ब्रँडचे टी-शर्ट घालतो, ज्याची किंमत 500 ते हजार रुपयांच्या घरात असते.

दीपिका पदुकोण

'छपाक'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोणने झारा ब्रँडचा जंपसूट परिधान केला होता. या जंपसूटची किंमत फक्त 1990 रुपये होती.

अनुष्का शर्मा

गेल्या वर्षी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती तपकिरी रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली होती. H&M ब्रँडच्या या टी-शर्टची किंमत फक्त 700 रुपये आहे. गरोदरपणात आयपीएल मॅच पाहण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्माने लाल रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला होता. Asos ब्रँडच्या या ड्रेसची किंमत फक्त 1800 रुपये आहे.

करीना कपूर

करीना कपूरही काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली होती. प्यूमा ब्रँडच्या या टी-शर्टची किंमत फक्त 819 रुपये आहे.

श्रद्धा कपूर

काही महिन्यांपूर्वी प्रवास करताना श्रद्धा कपूरने स्काय ब्लू कलरचा क्रॉप टॉप घातला होता. या टॉपची किंमत फक्त 499 रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...