आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने त्याच्या आगामी 'कुशी' या चित्रपटाच्या सेटवरील एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजयने चित्रपटातील 'ना रोजा नुव्वे' या गाण्यावर रील बनवली आहे. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडाने चित्रपटातील त्याची सहकलाकार सामंथा रुथ प्रभूसोबतचे रोमँटिक क्षण शेअर केले आहेत.
सामंथला रील बनवली जातेय याची माहिती नव्हती - विजय
विजय देवरकोंडा आणि सामंथा प्रभू यांच्या 'कुशी' या चित्रपटाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. हा चित्रपट यावर्षी 1 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'तिला माहित नाही की कुशी ही रील बनवत आहे', या ओळीने व्हिडिओची सुरुवात होते. व्हिडिओमध्ये विजयने शूटिंगदरम्यान सामंथासोबत सेटवर घालवलेले क्षण शेअर केले आहेत.
तू किती खास आहेस हे सांगण्याची संधी कुशी कधीही सोडत नाही - विजय
व्हिडिओच्या शेवटच्या शॉटमध्ये विजय सामंथाला मिठी मारताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत विजयने लिहिले, ' तू त्याच्यासाठी किती खास आहेस, हे सांगण्याची एकही संधी कुशी सोडत नाही.' 9 मे रोजी विजय देवरकोंडा याच्या वाढदिवसानिमित्त 'कुशी' या चित्रपटातील 'ना रोजा नुव्वे' हे गाणे रिलीज करण्यात आले होते.
विजय आणि सामंथाच्या केमिस्ट्रीचे चाहत्यांनी केले कौतुक
सोशल मीडियावर चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'सॅम तुझे स्मितहास्य खूप गोड आहे, तुला हसताना पाहून आनंद झाला.' एका चाहत्याने लिहिले, 'तुम्ही दोघे एकत्र खूप चांगले दिसत आहात.' एका युजरने लिहिले - 'मी हा व्हिडिओ अनेकदा पाहिला आहे आणि चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.'
विजय आणि समंथा यांच्याशिवाय या चित्रपटात वेनेला किशोर, जयराम, सचिन खेडेकर आणि मुरली शर्मा देखील दिसणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.