आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:रश्मिका मंदानासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया, म्हणाला- 'नेहमीप्रमाणे मूर्खपणा…'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचेही सांगितले गेले. मात्र आता स्वतः विजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

विजयची पोस्ट
विजय देवरकोंडाने रश्मिकासोबत लग्न करण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत एक ट्वीट केले आहे. विजयने या अफवांवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "नेहमीचा मूर्खपणा... अशा बातम्या आवडत नाहीत." त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे.

लग्नाबाबत रश्मिका म्हणाली...
अलीकडेच 25 वर्षीय रश्मिकाने एका मुलाखतीत लग्नाविषयीचे तिचे विचार सांगितले होते. रश्मिकाने सांगितले होते की, तिने आतापर्यंत तिच्या लग्नाचा विचार केलेला नाही. पण जोडीदार असा असावा, ज्याच्यासोबत कम्फर्टेबल आहे, असे वाटायला हवे.

दोघांनी 2 चित्रपटात एकत्र काम केले
रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांची जोडी खूप आवडली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअर आणि डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या. रश्मिका मंदाना सध्या तिचा बॉलिवूड डेब्यू 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...