आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणीत सापडला विजयराज:विनयभंगाच्या आरोपामुळे विजय राजची 'शेरनी'मधून हकालपट्टी, निर्मात्यांचे होणार 2 कोटींचे नुकसान!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता.

बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता विजय राजला विनयभंगाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. चित्रपटाच्या सेटवर एका महिला सहकलाकाराची छेड काढण्याचा त्याच्यावर आरोप आहे. गोंदियाचे पोलिस उपाधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, विजय राजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर मंगळवारी न्यायालयाने त्याला जामीन दिला.

या आरोपानंतर आता विजय राजची विद्या बालनीची प्रमुख भूमिका असलेल्या 'शेरनी' या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय राजला चित्रपटातून काढल्याने निर्मात्याला प्रत्येक दिवशी 20 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. विजय राज चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलपासून टीमसोबत होता.

निर्मात्यांना आता चित्रपट रिशूट करावा लागणार आहे. म्हणजेच विद्या बालन आणि इतर कलाकारांना सर्व सीन रिक्रिएट करावे लागतील. एकुण 22 दिवसांच्या चित्रीकरणात विजय राजचा सहभाग होता. अशा परिस्थितीत एकुण दोन कोटींचे नुकसान निर्मात्यांना होणे निश्चित आहे. निर्मात्यांना कुठलाही वाद नकोय, त्यामुळे त्यांनी तडकाफडकी विजय राजची चित्रपटातून गच्छंती केली. आता त्याच्या जागी नवीन कलाकाराला कास्ट केले जाईल.

गोंदियात सुरु आहे चित्रीकरण
विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेरनी’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. शूटिंगसाठी विजय राजसह संपूर्ण टीम गाेंदियात अाली होती. ती हॉटेल गेटवेमध्ये थांबली होती. सेटवर चित्रीकरण सुरू असताना विजय राजने आपला विनयभंग केल्याचा आरोप ३० वर्षीय महिला कलाकाराने केला. सोमवारी रात्री गाेंदियातील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी विजय राजला हॉटेलमधून अटक केली होती.

विजय राजने पीडिते माफी मागितली
सूत्रांनी सांगितल्यानुसार, ही घटना व्हॅनिटी व्हॅनमध्ये किंवा हॉटेलमधून बोलावून विनयभंग केल्याची नाहीये. सेटवर विजय राजने पीडितेच्या खांद्यावर हात ठेवला होता. यामागील आपला हेतू चुकीचा नव्हता असे विजय राजने म्हटले आहे. पीडितेच्या वयाची आपली मुलगी असल्याचे त्याने सांगितले. आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत असे करण्याचा विचार करू शकत नाही, असेही तो म्हणाला. पीडितेची विजय राजने माफी मागितली, मात्र पीडिता त्याला माफ करु शकली नाही. या घटनेमुळे विद्या बालन आणि बाकी कलाकारांनाही धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र 'शो मस्ट गो ऑन' म्हणत कलाकारांनी शूटिंग सुरू ठेवले.

ड्रग्ज प्रकरणात दुबईत झाली होती अटक
यापूर्वी विजय राजला 2005 मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

'कौवा बिर्याणी' दृश्यासाठी प्रसिद्ध
'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता. धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई एक्स्प्रेस, बॉम्बे टू गोवा आणि मान्सून वेडिंग हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.