आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय राज यांना दिलासा:मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, 'शेरनी'च्या शूटिंगदरम्यान असिस्टंट डायरेक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी अंतरिम दिलासा

अमित कर्ण17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय राज यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात अभिनेता विजय राज यांनी गोंदियात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपा विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. आता विजय यांना त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर नागपूर उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये 'शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राज यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकारानंतर गोंदियातून विजय यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काहीवेळातच त्यांचा जमीन मंजूर झाला होता.

गोंदियात होणार नाही विजय यांचे ट्रायल
विजय राज यांच्या वकील सविना बेदी सच्चर म्हणाल्या- "कोर्टाच्या या निर्णयानंतर आता विजय राज यांचे गोंदियात सध्या ट्रायल होणार नाही. विजय राज यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करायचा की नाही, हे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ ठरवत नाही, तोपर्यंत त्यांना येथे चौकशीसाठी बोलावले जाणार नाही."

वकील म्हणाल्या - सर्व आरोप निराधार
याच प्रकरणात, विजय राज यांच्याविरोधात गोंदियात भांदवी कलम 354 a आणि 354 d अंतर्गत एफआयआरही दाखल करण्यात आला होता. विजय राज यांनी आपल्या वकील सविना बेदी सच्चर यांच्यामार्फत एफआयआर रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. वकिलांच्या युक्तिवादानुसार, घटनेच्या दिवशी विजय राज सकाळी साडे सहा वाजता हॉटेलहून सेटवर शूटिंगसाठी गेले होते. त्यादिवशी त्यांच्यावर आरोप करणारी असिस्टंट डायरेक्टरसुद्धा सेटवर होती. मात्र एफआयआरमध्ये असे लिहिले होते की, त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता विजय राज यांनी हॉटेलच्या खोलीत असिस्टंट डायरेक्टची छेड काढली, जे शक्य नव्हते.

कारण विजय राज हे त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता हॉटेलमधून बाहेर पडले होते. त्यामुळे हा आरोप निराधार आणि काल्पनिक आहे. वकील सविना बेदी सच्चर म्हणाल्या की, या युक्तिवादाच्या आधारे कोर्टाकडून विजय राज यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...