आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथ स्टार विजय सेतूपतीचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन:ओळखणेही झाले कठीण, फोटो पाहून नेटक-यांनी केले कौतुक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य स्टार विजय सेतूपतीचा मोठा चाहता वर्ग मोठा आहे. विजय हा लवकरच शाहरुख खानच्या आगामी जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तत्पूर्वी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयने त्याचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील त्याचा लूक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोत विजय एकदम फिट दिसतोय. अनेकांनी त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक केले आहे.

विजयचा लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित
विजयने इन्स्टाग्रामवर त्याचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो व्हाईट शर्ट आणि चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे. विजयने या फोटोला काही कॅप्शन दिलेले नाही. पण त्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले. विजयने त्याचे वजन कमी केले आहे असे दिसत आहे. विक्रम चित्रपटासाठी त्याने वजन वाढवले होते. माध्यमांच्या रिपोर्टनुसार त्याने तब्बल 40 किलो वजन कमी केले आहे

नेटकरी करत आहेत कौतुक
फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी विजयच्या या लूकचे कौतुक केलं आहे. 'विजय या फोटोमध्ये हँडसम दिसत आहे,' अशी कमेंट एका युझरने केली. तर एक नेटकरी विजयला ओळखूच शकला नाही. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'विजयचं अकाऊंट हॅक झाले आहे का?'. एकाने लिहिले, 'विजय पूर्वीसारखा दिसत आहे', तर आणखी एका नेटक-याने लिहले, 'त्याने फिटनेसला गांभीर्याने घेतल्याने मला आनंद झाला.'

विजय लवकरच शाहरुख खान बरोबर ‘जवान’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तसेच तो श्रीराम राघवनच्या क्राइम-थ्रिलर टमेरी ख्रिसमसटमध्ये कतरिना कैफबरोबर दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...