आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर अपघात:विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या सेटवर स्टंट मॅनचा मृत्यू, 20 फूट उंचावरुन कोसळल्याने एस. सुरेश गतप्राण

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या आगामी 'विदुथलाई' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंट मास्टर एस सुरेश यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील वंदलूर येथे 'विदुथलाई'च्या शूटिंगदरम्यान स्टंट मास्टर 20 फूट उंचीवरून खाली पडले. 'विदुथलाई' या चित्रपटाचे दिग्दर्शन वेत्री मारन यांनी केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुरेश स्टंट डारेक्टरसोबतच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. चित्रपटाच्या सेटवर एक भव्य सेट तयार करण्यात आल होता. येथे स्टंट मास्टर एस सुरेश यांना एक स्टंट करायचा होता, ज्यामध्ये त्यांना 20 फूट उंचीवरून उडी मारायची होती. दुर्दैवाने क्रेनला दोरीने बांधलेले असतानाही दोरी तुटल्याने ते खाली पडले. त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सेटवर इतर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

एस. सुरेश
एस. सुरेश

अपघातानंतर तपास सुरू झाला
पोलिसांनी सेटवर झालेल्या अपघाताच तपास सुरू केला आहे. एस. सुरेश 25 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत होते. ते सुरुवातीपासून स्टंट मॅन होते आणि स्टंट करतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 'विदुथलाई' या चित्रपटात अभिनेता सुरी मुख्य भूमिकेत आहे, तर विजय सेतुपतीचा कॅमिओ आहे. या चित्रपटात विजय सुरीच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

या क्राईम-थ्रिलर चित्रपटात सुरी, विजय सेतुपती यांच्यासह प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भवानी श्री, राजीव मेनन, चेतन यांच्या भूमिका आहेत. चित्रपटातील बहुतांश दृश्ये सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...