आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता अलीकडेच पुन्हा एकदा हे कपल पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. तमन्ना विजयसोबत मुंबईतील एका थिएटरबाहेर दिसली. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही पापाराझींना टाळताना दिसले. दोघांनीही चेहऱ्यावर मास्क घातले होते, पण चाहत्यांनी त्यांना लगेच ओळखले.
दोघेही न्यू इयरला पहिल्यांदा दिसले होते एकत्र
न्यू इयर सेलिब्रेशनचा तमन्ना आणि विजयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना उधाण आले होते. तेव्हापासून दोघेही कायम एकत्र दिसत असतात.
सोनाक्षी सिन्हा विजयला तमन्नाच्या नावाने चिडवते
सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा यांची वेब सिरीज 'दहाड' 12 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर रिलीज झाली आहे. याआधी सिरीजच्या ट्रेलर लाँच वेळी सोनाक्षीने संपूर्ण टीमसह इव्हेंटमध्ये विजयला तमन्ना नावाने चिडवले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ट्रेलर लाँचच्या वेळी अभिनेता गुलशन देवय्या म्हणाला होता की, लहानपणापासून पडद्यावर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची माझी 'तमन्ना' होती. हे ऐकून विजय खूप लाजला होता.
'लस्ट स्टोरी 2' च्या शूटिंग दरम्यान झाली दोघांची मैत्री
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची भेट 'लस्ट स्टोरी 2' या वेब सिरीजच्या शूटिंगदरम्यान झाली होती. तिथून दोघांमधील जवळीक वाढली. आपल्या नात्यावर विजय आणि तमन्ना यांनी चुप्पी साधली. पण काही दिवसांपूर्वी तमन्ना विजयसोबतच्या आपल्या नात्याबद्दल म्हणाली होती की, कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. अशा अफवा पसरत असतातच. त्या प्रत्येकावर मी काही बोलू शकत नाही. मी काही नेटकऱ्यांच्या अफवांवर प्रतिक्रिया देण्यास बांधील नाही, असे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.