आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर ब्लास्टर:विजय स्टारर 'मास्टर'ने 7 दिवसांत जमवला 100 कोटींहून अधिकचा गल्ला, ठरला कोरोना काळातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयच्या चित्रपटाने तिकीटबारीवर 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजयचा 'मास्टर' हा चित्रपट तमिळनाडूतील काही चित्रपटगृहांत 100 टक्के ऑक्युपेंसीसह रिलीज करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी ज्या थिएटर मालकांनी कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पण आता याचा फायदा चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर कलेक्शनला होत आहे. विजयच्या चित्रपटाने तिकीटबारीवर 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

दक्षिणेत चालली चित्रपटाची जादू

दीडशे कोटींच्या आकड्याला स्पर्श करणारा विजयचा हा पाचवा चित्रपट आहे. राज्यनिहाय कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास, पहिल्याच आठवड्यात तामिळनाडूमध्ये चित्रपटाने 96 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला. त्याशिवाय आंध्र प्रदेशात केवळ 24 कोटी, कर्नाटकात 14 कोटी आणि उत्तर भारतात केवळ 5 कोटी रुपये जमा करण्यात चित्रपटाला यश आले.

ओव्हरसीज बद्दल बोलायचे झाल्या, ओव्हरसीज ओपनिंग वीकेंड कलेक्शन 4.6 मिलियन डॉलर राहिले.

ओटीटीवर रिलीज होणार 'मास्टर'
निर्मात्यांनी आता मास्टर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुमित कदेल यांच्या म्हणण्यानुसार, व्हॅलेंटाईन वीकमध्ये मास्टर 12 फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होईल. रवि तेजाच्या क्रॅक चित्रपटाच्या थिएटर आणि डिजिटल रिलीजमध्ये जवळपास एक महिन्याचे अंतर होते. क्रॅक 29 जानेवारी रोजी डिजिटली रिलीज होत आहे.

मास्टर या चित्रपटामध्ये मालविका मोहनन, अर्जुन दास, एंड्रिया जेरेमिया, आणि शांतनु भाग्यराज मुख्य भूमिकेत आहेत. अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत असलेला हा चित्रपट 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...