आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास दुबे एन्काउंटर:तापसी पन्नू म्हणाली - हा घटनाक्रम एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे; दिग्दर्शक ओनीर म्हणाले - ही लोकशाहीची खिल्ली 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक ओनिर यांनी ही लोकशाहीची थट्टा असल्याचे म्हटले आहे.

कानपूरच्या बिकरू गावात सीओसह आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे शुक्रवारी सकाळी चकमकीत ठार झाला. यूपी एसटीएफची टीम त्याला उज्जैनहून कानपूर येथे ट्रान्झिट रिमांडवर घेऊन जात होती. परंतु कानपूरपासून 17 किमी दूर सकाळी 6.30 वाजता ताफ्यातील एक गाडी उलटली. आणि त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमध्ये विकास दुबे ठार झाला. या एन्काउंटवरुन सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्न उपस्थित करणा-यांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या नावाचाही समावेश आहे. हा घटनाक्रम एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटत असल्याने तापसीने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. 

अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विटरद्वारे विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • दिग्दर्शक ओनिर यांनी ही लोकशाहीची थट्टा असल्याचे म्हटले

बॉलिवूडचे दिग्दर्शक ओनीर यांनीही या चकमकीबद्दल ट्विट केले असून याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “विकास दुबे चकमक ही एक अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. काय भाकीत वर्तवले गेले होते, की असे काही होण्याची प्रतीक्षा होती. ही लोकशाहीची खिल्ली उडविणारी घटना आहे आणि ख-या चौकशीतून वेगवेगळ्या राजकीय संबद्ध असलेल्या अनेक बलाढ्य राजकीय नावांचे कनेक्शन उघड झाले असते', असे त्यांनी म्हटले आहे. 

पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये विकास दुबेच्या छातीत आणि कमरेत गोळी लागली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे सकाळी 7.55 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. कानपूर रेंजच्या आयजीने विकासच्या मृत्यूची पुष्टी केली. विकास दुबेला गुरुवारी सकाळी उज्जैन मंदिरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास अटक केली होती. यावेळी घाबरलेला हिस्ट्रीशीटर अटकेवेळी ओरडत होता मी विकास दुबे आहे, कानपूरवाला. यानंतर पोलिसांनी त्याला अगोदर महाकाल पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोल रूम, नरवर पोलिस स्टेशन आणि नंतर पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे नेले. येथे सुमारे दोन तास त्याच्याकडे चौकशी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...