आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर इंटरव्ह्यू:52 वर्षांचे झाले विक्रम भट्ट, म्हणाले - OTT प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य जास्त आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही तयार कराल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक विक्रम भट्ट 52 वर्षांचे झाले आहेत.

'फरेब', 'गुलाम', 'फुटपाथ' आणि '1920' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक विक्रम भट्ट 52 वर्षांचे झाले आहेत. 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत जन्मलेल्या भट्ट यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्य मराठीसोबत आपल्या जीवनाशी संबंधित बर्‍याच गोष्टी शेअर केल्या. त्यांच्या मुलाखतीचा काही भागः

Q. तुम्ही ओटीटीवरही बरेच काम केले आहे. वेब सीरिजला चित्रपटांपेक्षा सर्जनशील स्वातंत्र्य असते. तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्मकडे कसे बघता?
A. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बरेच स्वातंत्र्य आहे. मला कायमच वाटतं की स्वातंत्र्यासह जबाबदा-यादेखील येतात. फक्त स्वातंत्र्य राहूनच चालत नाही तर आपल्याला जबाबदार देखील असले पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही काहीही करू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मचे बरेच फायदे आहेत.

Q. विवादाचा वैयक्तिक जीवनावर किती परिणाम होतो?
A.
एक काळ असा होता की अशा गोष्टींचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत होता. परंतु हळूहळू आपण अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देणे थांबवता. मला वाटते लोकांची स्मरणशक्ती इतकी चांगली नाही की त्यांना जुन्या गोष्टी अधिक लक्षात राहतील. एक काळ असा होता की मी कायम वादात असायचो. लोकांना त्यावेळी माहित होतं पण आज लोकांना कदाचित त्याबद्दलही काही आठवतही नसेल. आपले जीवन सत्यासह जगणे महत्वाचे आहे.

Q. तुम्ही मुकुल एस. आनंद, शेखर कपूर आणि महेश भट्ट अशा वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आपल्यावर सर्वाधिक कुणाचा प्रभाव राहिला आहे?
A. मला वाटते महेश भट्ट. कारण मी त्यांना तेव्हापासून ओळखतो, जेव्हा माझे वडील त्यांच्याबरोबर काम करायचे. माझे वडील प्रवीण भट्ट कॅमेरामन होते. माझ्या वडिलांनी बहुतेक चित्रपट महेश भट्ट सोबत केले. म्हणूनच मी लहानपणापासूनच त्यांना पहात आलो आहे.

Q. महेश भट्ट कडून तुम्ही काय शिकलात?
A. मी सर्वांना नेहमीच सांगत आलोय की, मी महेश भट्ट यांच्याकडून फिल्म मेकिंग कमी आणि आयुष्य कसे जगायचे ते अधिक शिकलो आहे. मी माझ्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. जे काही झाले आहे किंवा जीवनाचा अर्थ काय आहे? आयुष्याला आपल्याला काय शिकवायचे आहे? हे मी त्यांच्याशी बोलत असताना, पहात असताना शिकलो आहे. माझा असा विश्वास आहे की चित्रपटाची निर्मिती त्यात कुठेतरी लपलेली आहे. जो आयुष्य नीट जगू शकत नाही, तो चित्रपट काय करेल?

Q. आपल्या कारकिर्दीची सुरुवात रोमँटिक चित्रपटापासून झाली आणि नंतर तुम्ही थ्रिलर, मिस्ट्री आणि हॉरर चित्रपटांकडे वळला. हा बदल कसा झाला?
A. मी माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीस एक प्रेमकथा बनवली. कारण मी त्यावेळी असा विचार केला होता की मी इंडस्ट्रीत नवीन दिग्दर्शक आहे आणि करिअरची सुरुवात अशा चित्रपटाने करावी ज्याला मार्केटमध्ये जास्त डिमांड असते. मग हळू हळू माझ्या लक्षात आले की, मला स्वतःला आवडेल असे चित्रपट करावे. कारण जे स्वतःला आवडणार नाही ते लोकांना काय आवडेल, असा विचार मी केला. नंतर माझ्या लक्षात आले की मला लहानपणापासूनच थरार, रहस्यमय आणि भयपट कथा आवडतात. मग मी मला आवडतील अशा गोष्टींवर चित्रपट बनवायला सुरुवात केली.

Q. सध्या सिक्वेल आणि रीमेकचा काळ आहे. तुम्ही स्वतःही सिक्वेल बनवले आहेत. आपण कधी 'गुलाम' चा रिमेक किंवा सिक्वेल बनवण्याचा विचार केला आहे?
A. आमिर खानशिवाय गुलाम बनू शकत नाही. जर आमिरने मनात आणले तर पुन्हा 'गुलाम' बनू शकतो. अन्यथा ते शक्य नाही.

Q. कोणत्या अभिनेत्याचे तुम्ही चाहते आहात?
A. मी लहानपणापासून फक्त एकाच अभिनेत्याचा चाहता आहे आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन. मी अजूनही त्यांचे जुन्या चित्रपटांमधील दृश्ये पाहण्यात यूट्यूबवर अधिकाधिकवेळ घालवतो.

Q. वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांच्यासह तुम्हाला एक दिवस घालवण्याची संधी मिळाली तर काय कराल?
A. मी एका कोप-यात शांतपणे बसून त्यांचे काम बघेन.

बातम्या आणखी आहेत...