आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विक्रम वेधा’चे शूटिंग पूर्ण:दोन लूकमध्ये दिसेल हृतिक, 50 दिवसांत चित्रीकरण पूर्ण; 10 ते 12 किलो वजनही केले कमी

अमित कर्ण20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 99 दिवस चालले चित्रपटाचे चित्रीकरण, डेडलाइनपेक्षा फक्त 1 दिवस जास्त घेऊन शेड्यूल पूर्ण

हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक आपल्या डेडलाइनपेक्षा केवळ एक दिवस जास्त कालावधीत पूर्ण झाला. चित्रपटातील शेवटच्या टप्प्याचे मुंबईत चित्रीकरण करण्यात आले. 31 मे डेडलाइन देण्यात आली होती. ती 1 जूनला पूर्ण झाली. दिग्दर्शक गायत्री अतिशय आनंदात आहेत. हृतिकने त्यांच्या अपेक्षेहून कितीतरी पट जास्त चांगले काम केले आहे. चित्रपटाशी निगडीत सुत्रांनी काही खास माहिती दिली.

चित्रपटाची कथा सुरू होते ती कानपूरमधून. व्हाया लखनऊ होऊन ती मुंबईत पूर्ण होते. हृतिकच्या पात्राला तेथे सत्ता गाजवायची आहे. रोचक बाब ही की, चित्रपटातील लखनऊ आणि कानपूरला अबूधाबीत रिक्रिएट करण्यात आले. अबूधाबीच्या किजाद येथे हे रिक्रिएशन पूर्ण करण्यात आले. सोबतच एडिटींगचे कामही समांतर सुरू होते. चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मड आयलँडमध्ये पूर्ण झाला चार ते पाच दिवसांचा डान्स सिक्वेन्स
सूत्रानुसार, चित्रपटातील शेवटच्या टप्प्याचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झाले. मुंबईत शेवटच्या काही दिवसांत एका गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले. ते गणेश हेगडेने कोरिओग्राफ केले आहे. खरेतर गणेश, हृतिकचा आवडता कोरिओग्राफर पार्टनर आहे. चित्रपटात हृतिक नकारात्मक ‘वेधा’च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात त्याच्या वेगवान नृत्याची झलकही पाहायला मिळणार आहे. मुंबईत चार-पाच दिवस नृत्याचे चित्रिकरण करण्यात आले. हा सिक्वेन्स मड आयलँडमध्ये पूर्ण करण्यात आला. चित्रपटात विक्रम आणि वेधामध्ये उंदीर-मांजरामध्ये चालतो तसा खेळ दाखवण्यात आला आहे.

मुंबई-पुणे विद्यापीठात अनेक दृश्यांचे चित्रीकरण
चित्रपटात हृतिकने ‘पार्को’ अ‍ॅक्शन साकारली आहे. सरळ भाषेत सांगायचे तर रस्सीचा आधार नघेता सरळ भिंतीवर चढणाऱ्या स्टंटला ‘पार्को’ अ‍ॅक्शन म्हणतात. ती वेधा म्हणजेच हृतिकने साकारली आहे. अनेक दृश्यांचे मुंबईच्या कलिना विद्यापीठात चित्रिकरण झाले. त्याशिवाय टीमने पुणे विद्यापीठात चित्रिकरण केले आहे. नुकतीच चर्चेत राहिलेली वेब सिरिज ‘रॉकेट बॉइज’चे चित्रिकरण झाले होते. मुंबईतील चित्रिकरण याच वर्षी मार्चमध्ये सुरू करण्यात आले. तेथे पहिल्यांदा चार-पाच दिवस सलग चित्रिकरण झाले. त्यानंतर फिल्म सिटी, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि मड आयलँड येथे चित्रिकरण झाले.

मुंबई शेड्यूलमध्ये सैफ आणि हृतिकने शेअर केली फ्रेम
सैफ चित्रपटात इन्स्पेक्टर विक्रमच्या भूमिकेत झळकणार आहे. विक्रम आणि वेधातील अनेक दृश्यांचे मुंबईत चित्रिकरण करण्यात आले. मुंबईतील शेड्यूलमध्येही दोघेही एकाच फ्रेममध्ये दिसले. सुत्रांनी सांगितले की हृतिकला सेटवर अतिशय शांत, नियंत्रित वातावरण हवे असायचे. तो आला की सेटवर सन्नाटा पसरायचा. फक्त कामाचीच चर्चा व्हायची. हृतिक यानंतर लगेच ‘फायटर’चे चित्रिकरण करणार आहे. ‘कृष’च्या पुढील भागाचे स्क्रिप्ट रिडिंग आणि लोकेशन्सला अंतिम रुप दिले जात आहे.

चित्रपटात वेधाचा रोमँटिक अँगल दिसणार नाही ...
हृतिक चित्रपटात दोन लूकमध्ये दिसणार आहे. तरुण वेधा साकारण्यासाठी त्याने 10 ते 12 किलो वजन कमी केले. चित्रपटात वेधाचा रोमँटिक अँगल दिसणार नाही. चित्रिकरण 99 दिवस चालले. त्यातील 30 दिवस अबुधाबीत चित्रिकरण झाले. त्यानंतर एक महिना लखनऊमध्ये सैफ अली खानने राधिका आपटेसह चित्रिकरण पूर्ण केले. राधिका त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती वकील बनली असून वेधाचा खटला लढते. हृतिकने अबुधाबी, मुंबईत शूटिंग केले.

बातम्या आणखी आहेत...