आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा'चा ट्रेलर रिलीज:हृतिक रोशन-सैफ अली खान यांच्यात रंगली काटें की टक्कर, 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका ट्रेलरमध्ये दिसतोय. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट विक्रम-बेतालच्या पौराणिक कथेपासून प्रेरित आहे. ट्रेलरमधील हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा डॅशिंग अंदाज लक्ष वेधून घेतोय.

खलनायकाच्या भूमिकेत हृतिक शोभून दिसतोय, तर पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत सैफचा अंदाजही लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरची सुरुवात एका दमदार संवादाने होते, 'हम अक्सर सोचते हैं कि कहानी के सिर्फ दो ही सिरे होते हैं, अच्छाई या बुराई। लेकिन हमारी ये सोच गलत है शायद। क्या हर बुराई वाकई बुरी होती है? क्या हर अच्छाई वाकई अच्छी होती है? अक्सर सच सही और झूठ गलत होता है, पर इस कहानी में सच और झूठ दोनों ही गलत हैं।' त्यानंतर हृतिक रोशनची दमदार एंट्री होते.

पोलिस अधिका-याच्या भूमिकेतील सैफ अली खानचादेखील एक संवाद लक्ष वेधून घेतोय. 'तुम्हें पता है कि हर एन्काउंटर के बाद भी मैं चैन की नींद क्यों सो पाता हूं? क्योंकि हम जानते हैं कि हमने किसी बेगुनाह को नहीं मारा।' असे सैफ म्हणताना दिसतोय. सैफ आणि हृतिक यांच्यात काटें की टक्कर रंगलेली ट्रेलरमध्ये दिसतेय. हा चित्रपट आर. माधवन आणि विजय सेतुपती यांच्या विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. ट्रेलरमध्ये सैफ आणि राधिकाचा रोमँटिक अंदाजही बघायला मिळतोय.

चित्रपटात वेधाचा रोमँटिक अँगल दिसणार नाही ...
हृतिक चित्रपटात दोन लूकमध्ये दिसणार आहे. तरुण वेधा साकारण्यासाठी त्याने 10 ते 12 किलो वजन कमी केले. चित्रपटात वेधाचा रोमँटिक अँगल दिसणार नाही. चित्रपटाचे चित्रिकरण 99 दिवस चालले. त्यातील 30 दिवस अबुधाबीत चित्रिकरण झाले. त्यानंतर एक महिना लखनऊमध्ये सैफ अली खानने राधिका आपटेसह चित्रिकरण पूर्ण केले. राधिका त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती वकील बनली असून वेधाचा खटला लढते. हृतिकने अबुधाबी, मुंबईत शूटिंग केले.

पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात हृतिक, सैफसह राधिका आपटेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...