आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रांत-शीतलचं लग्न:विक्रांत मैसी-शीतल ठाकूर आज लग्नगाठीत अडकणार, हळदी समारंभात 'देसी गर्ल' गाण्यावर धरला होता दोघांनी ताल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत

अभिनेता विक्रांत मैसीने 4 दिवसांपूर्वी म्हणजे व्हॅलेंटाईन डेला त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत रजिस्टर्ड लग्न केले होते. आता विक्रांत आणि शीतल हे दोघेही आज (18 फेब्रुवारी) मुंबईत पारंपारिक सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, या दोघांचे लग्नाआधीच्या विधींचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विक्रांत आणि शीतल हळदी समारंभात 'देसी गर्ल' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “दोघे नेहमी त्यांच्या नात्याबद्दल कमी बोलतात, पण त्यांनी कधीच गुप्तता बाळगली नाही. आज लग्न झाल्यानंतर या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर येतील. वधू आणि वर म्हणून या जोडप्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आज त्यांच्या लग्नाची झलक बघायला मिळेल."

लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत
या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि काही सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, रजिस्टर मॅरेजनंतर दोघेही नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये विक्रांत आणि शीतलचा साखरपुडा झाला होता. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.

विक्रांतने शीतलसोबत त्याच्या वर्सोव्यातील घरात केले होते रजिस्टर्ड लग्न
विक्रांतने वर्सोव्यातील त्याच्या घरी 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला शीतलसोबत रजिस्टर्ड लग्न केले होते. या खास निमित्ताने या जोडप्याने फक्त खास लोकांनाच आमंत्रित केले होते. या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली होती. विक्रांत आणि शीतलच्या लग्नामुळे दोघांचे कुटुंब खूप आनंदी आहे.

सोशल मीडियावर पत्नी म्हणून केला उल्लेख
विक्रांतने गेल्या वर्षी त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर घरातील पूजेचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची आई आणि शीतलही बसलेली दिसत आहे. त्याच्या कॅप्शन लिहिले आहे, 'मी माझ्या मोदक आणि पत्नीसह (बेटर हाफ). यासोबतच त्याने एका नोटमध्ये लिहिले होते की, आम्ही अजून लग्न केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...