आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रांत-शीतलचे लग्न:विक्रांत मैसीने शीतलसोबत केले रजिस्टर्ड लग्न, अनेक वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंब आणि जवळचे मित्र झाले होते सहभागी

अभिनेता विक्रांत मैसीने त्याच्या लाँग टाइम गर्लफ्रेंडशी लग्न केले आहे. दोघांनी 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला रजिस्टर्ड लग्न केले आहे. या खास निमित्ताने या जोडप्याने फक्त खास लोकांनाच आमंत्रित केले होते. विक्रांत आणि शीतल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

कुटुंब आणि जवळचे मित्र झाले होते सहभागी
पिंकविलाच्या वृत्तानुसार, विक्रांत आणि शीतल यांनी सोमवारी मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या घरी नोंदणीकृत विवाह केला आहे. या सोहळ्याला कपलच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली होती. विक्रांत आणि शीतलच्या लग्नामुळे दोघांचे कुटुंब खूप आनंदी आहे.

सोशल मीडियावर पत्नी म्हणून केला उल्लेख
विक्रांतने गेल्या वर्षी त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर घरातील पूजेचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची आई आणि शीतलही बसलेली दिसत आहे. त्याच्या कॅप्शन लिहिले आहे, 'मी माझ्या मोदक आणि पत्नीसह (बेटर हाफ). यासोबतच त्याने एका नोटमध्ये लिहिले होते की, आम्ही अजून लग्न केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...