आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:अभिनेता विक्रांत मैसी गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत विवाहबद्ध, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विक्रांत आणि शीतलच्या लग्नाला सुमोना चक्रवर्तीची हजेरी

अभिनेता विक्रांत मैसी त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत 18 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाला. दोघांनी हिमाचल प्रदेशातील रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांच्या लग्नाच्या विधी आणि इतर फंक्शन्समध्ये फक्त जवळचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

तत्पूर्वी दोघांनी 14 फेब्रुवारी रोजी रजिस्टर्ड लग्न केले होते.

विक्रांत आणि शीतलच्या लग्नाला सुमोना चक्रवर्तीची हजेरी
विक्रांत आणि शीतलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये विक्रांतने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. तर शीतल रेड ब्राइडल लहेंग्यात दिसत आहे. लग्नात अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने हजेरी लावली होती. ती दोघांची खूप चांगली मैत्रीण आहे.

विक्रांत बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो शीतलबद्दल बोलायचे झाले तर ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2017 मध्ये ती 'ब्रृजमोहन अमर रहे'मध्ये दिसली होती. तर विक्रांत हा बॉलिवूडमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम करून तो चाहत्यांची मने जिंकत आहे. दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटात काम करून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटानंतर विक्रांतने कधीच मागे वळून पाहिले नाही.

बातम्या आणखी आहेत...