आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्ना यांची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:वडील म्हणाले होते तू चित्रपटात पाऊल टाकलेस तर तुझा जीव घेईल, स्टारडम मिळाल्यानंतर सर्वकाही सोडून बनले होते सन्यासी

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका आठवड्यात साइन केले होते 15 सिनेमे

बॉलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता म्हणून ओळखले जाणारे विनोद खन्ना यांची आज (6 ऑक्टोबर) बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. 6 ऑक्टोबर 1946ला पाकिस्तानच्या पेशावरमध्ये विनोद खन्ना यांचा जन्म झाला होता. 2017 मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. शेवटच्या दिवसांत त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती, पण ती अपूर्ण राहिली. पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे वडिलोपार्जित घर बघण्याचे त्यांचे स्वप्न होते. विनोद यांचे नाव इंडस्ट्रीतील अशा कलाकारांमध्ये घेतले जाते, ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. खलनायक बनून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर नायक बनून चित्रपटाच्या पडद्यावर त्यांनी वर्चस्व गाजवले.

सुनील दत्त यांनी दिली होती पडद्यावर येण्याची पहिली संधी

लहान असताना अत्यंत लाजाळू असलेल्या विनोद खन्ना यांना शाळेत त्यांच्या शिक्षिकेने नाटकात काम दिले होते. येथूनच त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली होती. बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असताना विनोद खन्ना यांनी 'सोलवां साल' आणि 'मुगल-ए-आजम' सारखे चित्रपट पाहिले आणि या चित्रपटांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला आणि त्यांनी नायक होण्यासाठी प्रयत्न करायचा ठरवले. विनोद मुंबईतील सिडेनहेम कॉलेजमध्ये शिकत होते. बॉलिवूडमध्ये त्यांची कोणाशीही ओळख नव्हती. फक्त रुप आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सुंदर होते. दरम्यान, एका पार्टीत त्यांना निर्माता-दिग्दर्शक सुनील दत्त यांची भेट घेण्याची संधी मिळाली. सुनील आपल्या ‘मन का मीत’ या चित्रपटासाठी नवीन चेह-यांचा शोध घेत होते. त्यांनी विनोद यांना चित्रपटात सह-अभिनेता म्हणून काम करण्याची ऑफर दिली. चित्रपट फारसा चालला नाही, पण विनोद यांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली.

कॉलेजमध्ये झाले पहिले प्रेम
भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंबीय मुंबईला आले होते. त्यांचे वडील टेक्सटाइल बिझनेसमन होते. मुंबई आणि दिल्लीमध्ये शाळेय शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजच्या दिवसांत विनोद इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत होते. विनोद सायन्सचे विद्यार्थी होते. मात्र त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की विनोद यांनी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यावे आणि शिक्षणानंतर घरातील बिझनेसशी जुडावे. कॉलेज लाइफमध्ये त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. येथेच त्यांनी भेट गितांजलीसोबत झाली. गितांजली विनोद यांच्या पहिली पत्नी होत्या. कॉलेजपासूनच त्यांची लव्ह-स्टोरी सुरु झाली होती.

जेव्हा वडिलांनी दाखवला होता बंदूकीचा धाक
सुनील दत्त यांनी विनोद खन्ना यांना चित्रपटात भूमिका ऑफर केली. मात्र याविषयी जेव्हा विनोद यांच्या वडिलांना माहित झाले तेव्हा त्यांनी विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवला. त्यांनी सांगितले, की तू सिनेमात काम केलेस तर मी तुला गोळी मारेल. मात्र विनोद यांच्या आईने वडिलांना समजावले आणि दोन वर्षांची मुदत दिली. वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा.

एका आठवड्यात साइन केले 15 सिनेमे
विनोद यांचा 'मन की मीत' हा पहिला सिनेमा होता. सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. त्यानंतर एक आठवड्यात विनोद यांनी जवळपास 15 सिनेमे साइन केले. सिनेमांत यश मिळाल्यानंतर विनोद आणि गितांजली यांनी लग्न केले. दोघांना राहूल आणि अक्षय खन्ना ही दोन मुले आहेत.

ओशोंमुळे प्रभावित झाले विनोद
एकेकाळी विनोद कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते. असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले. विनोद पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जात होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले. डिसेंबर 1957मध्ये विनोद यांनी सिनेमांपासून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना 'सेक्सी सन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद अमेरिकेला निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्षे घालवले. तिथे त्यांनी माळीचे काम केले.

गितांजलीशी तुटले नाते
4-5 वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यापासून दूर गेले. ते भारतात परतल्यानंतर त्यांना पत्नीने घटस्फोट दिला. कुटुंबीय दूर गेल्यानंतर 1987मध्ये विनोद यांनी 'इन्साफ' सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. पुन्हा करिअरला सुरुवात केल्यानंतर विनोद यांनी 1990मध्ये कवितासोबत लग्न केले. दोघांना मुलगा साक्षी आणि मुलगी श्रध्दा ही दोन मुले आहेत. कविता विनोद यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत.

विनोद खन्ना यांचे शेवटचे चित्रपट
'वाँटेड', 'दबंग' आणि 'दबंग 2' मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. शाहरुख खानच्या 'दिलवाले'मध्ये ते अखेरचे झळकले होते. 2015 मध्ये हा चित्रपट आला होता.

बातम्या आणखी आहेत...