आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांना पुर्णविराम:प्रेग्नेंसीच्या बातम्या चर्चेत असताना TMC खासदार नुसरतचा गरोदरपणातला फोटो आला समोर, नवरा निखिल म्हणतो -  हे मुल माझं नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हायरल फोटोत नुसरत बंगाली अभिनेत्री तनुश्री आणि श्रावंती चॅटर्जीसोबत दिसतेय.

बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती निखिल जैनपासून ती वेगळी झाली आहे. दरम्यान ती गरोदर असल्याचीही चर्चा सुरु होती. पण आता नुसरत गरोदर असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. नुसरतचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ती तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. या व्हायरल फोटोत नुसरत बंगाली अभिनेत्री तनुश्री आणि श्रावंती चॅटर्जीसोबत दिसतेय.

रिपोर्ट्सनुसार नुसरतचा सेकंड ट्रायमेस्टर सुरु आहे. पण निखिल जैनने सांगितल्यानुसार, 'मागील सहा महिन्यांपासून नुसरत आणि मी वेगळे राहात आहोत, त्यामुळे ती गरोदर असल्याचे मला ठाऊक नाही. आणि असे असल्यात ते मुलं माझे नाही.'

काही दिवसांतच वागण्यात बदल झाला होता : निखिल
नुसरतपासून वेगळे झालेल्या निखिलने एका निवेदनात म्हटले की, मी माझा वेळ आणि इतर गोष्टी पती प्रमाणे नुसरतला दिल्या. माझे कुटुंब, फ्रेंड आणि जवळच्या सर्वांना माहिती आहे की, मी नुसरतसाठी खुप काही केले. मी कोणत्याही स्वार्थाशिवाय तिला नेहमी सपोर्ट केला. मात्र लग्नाच्या काही काळानंतरच माझ्या आणि वैवाहिक जीवनाविषयी तिच्या वागण्यात बदल दिसण्यास सुरुवात झाली.

2 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
निखिलने म्हटले की, आमच्यात प्रेम नव्हते, तरीही मी नुसरतला प्रपोज केले होते. तिनेही आनंदात मला स्वीकारले. आम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी टर्कीला गेलो होतो. 2019 मध्ये लग्न केल्यानंतर आम्ही कोलकातामध्ये रिसेप्शन दिले होते. आम्ही पती-पत्नीप्रमाणे राहिलो आणि समाजामध्येही आम्ही असाच परिचय दिला.

नुसरत आणि निखिल यांचे लग्न 2019 मध्ये पार पडलेल्या सर्वच विवाहसोहळ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न होते. दोघांनी टर्कीमध्ये लग्न केले होतं आणि हनीमूनसाठी ते ग्रीसला गेले होते. या दोघांच्या लग्नापासून ते हनीमूनपर्यंत सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण नुसरतने अलीकडेच निखिल जैनसोबत टर्कीमध्ये झालेल्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत.

कायदेशीररित्या आमचे लग्न मान्य नाही - नुसरत
नुसरतने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले, 'निखिल आणि माझे लग्न इंटर रिलिजन होते. त्यामुळे आम्ही दोघांनी भारतातील 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'नुसार लग्न करणे अपेक्षित होते. इथल्या कायद्यानुसार हे लग्न झालेले नव्हते त्यामुळे याला लग्न म्हणता येणार नाही. हे केवळ एक लिव्ह इन रिलेशनशिप होते. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही.'

बातम्या आणखी आहेत...