आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:पारस छाबडाच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत मिका सिंगने थाटले लग्न? दोघेही गुरुद्वारामध्ये दिसले एकत्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओमध्ये दोघेही गुरुद्वारात दिसत आहेत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरी आणि गायक मिका सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: आकांक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. दोघांना एकत्र बघून चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. आकांक्षा आणि मिका रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

व्हिडिओमध्ये दोघेही गुरुद्वारात दिसत आहेत
व्हिडिओमध्ये मिका सफेद शर्ट आणि जीन्समध्ये दिसतोय. तर आकांक्षाने लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसतेय. या व्हिडिओमध्ये ती आणि मिका सिंग गुरुद्वारामध्ये असल्याचे दिसत आहे. तेथे त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत आकांक्षाने ‘आशिर्वाद घेत आहोत’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तसेच तिने हा व्हिडिओ मिका सिंगला टॅग करत हार्ट असलेले इमोजी वापरले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.

आकांक्षासोबतचे काही व्हिडिओ मिकानेदेखील केले शेअर
गुरुद्वारातील आकांक्षासोबतचे काही व्हिडिओ मिकानेदेखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. हे व्हिडिओ समोर आल्यापासून मिका आणि आंकाक्षा यांनी लग्न केल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. मात्र यावर मिका आणि आकांक्षा यांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. या दोघांनी खरंच लग्न केले की नाही किंवा भविष्यात करणार आहेत का? हे येणा-या दिवसांतच स्पष्ट होईल.

पारस छाबडासोबत रिलेशनशिपमध्ये होती आकांक्षा
आकांक्षा बिग बॉस 13 टा स्पर्धक पारस छाबडाची एक्स गर्लफ्रेंड आहे. पारस शोमध्ये सहभागी झाला तेव्हा आकांक्षा आणि तो एकमेकांना डेट करत होते. मात्र पारस शोमधून बाहेर आल्यानंतर दोघे वेगळे झाले.

बातम्या आणखी आहेत...