आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईत आरसीबी संघातील सदस्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. यादरम्यान पापाराझींनी विराट-अनुष्काला रेस्टॉरंटच्या बाहेर फोटो क्लिक करण्याची विनंती केली. दरम्यान, चुकून कोणीतरी अनुष्काला सर म्हणून हाक मारली. हे ऐकताच विराटने पापाराझींची फिरकी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
विराटच्या विनोदबुद्धीचे चाहत्यांनी केले कौतुक
विराटने अनुष्का को तो सर बोला दिया, अब मुझे भी मॅम बोल दे, असे पापाराझींना गमतीने सांगितले. पापाराझींनीही हसत हसत विराटला सॉरी म्हटले. सोशल मीडियावरही लोकांना विराट-अनुष्काचा हा व्हिडीओ खूप आवडत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका युझरने लिहिले - विराटची विनोदबुद्धी उत्तम आहे. तर एका यूजरने लिहिले - अनुष्का सर ऐकणे वाईट नाही.
डिनर डेटसाठी अनुष्का पांढऱ्या स्लीव्हलेस टॉप आणि व्हाइट पँटमध्ये दिसली. तर विराट प्रिंटेड शर्ट, काळ्या पँटमध्ये दिसला.
अनुष्का लवकरच चकदा एक्सप्रेस या चित्रपटात क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शेवटची 2018 मध्ये झिरो या चित्रपटात दिसली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.