आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'विरुष्का'च्या बाळाचं बारसं:अनुष्का -विराट यांनी मुलीचा पहिला फोटो केला शेअर, नाव ठेवले 'वामिका'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरुष्काची 'वामिका'

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दोघेही आपल्या लाडक्या लेकीला न्याहाळताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन चाहत्यांच्या या लाडक्या जोडीने आपल्या मुलीचे नावही सांगितले आहे.

विरुष्काची 'वामिका'
चाहत्यांमध्ये विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट आणि अनुष्का यांनी आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. अनुष्काने आपल्या बाळाचा हा पहिला फोटो अविस्मरणीय बनवण्यासाठी त्याला खूप खास कॅप्शन दिले आहे. अनुष्का शर्माने लिहिले की, "आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो परंतु या छोट्याशा वामिकाने याला नवीन स्तरावर आणले आहे. अश्रू, हसणे, चिंता, आनंद - या भावना आम्ही या क्षणी एकत्र जगलो आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत," अशा शब्दांत अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी माध्यमांना केली होती विनंती

11 जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अनुष्काने मुलीला जन्म दिला होता. विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर करत मीडियाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, असे म्हटले होते. यानंतर दोघांनीही ऑफिशियल स्टेटमेंट जारी करत मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका, अशी विनंती माध्यमांना केली होती.

‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले होते. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले होते. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत', असे त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...