आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कोविड -19 च्या लढ्यात लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यासाठी त्यांनी #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का क्राऊड फंडिंगच्या मदतीने 7 कोटी रुपये जमा करतील. हे पैसे गरजुंच्या मदतीसाठी वापरले जातील. यात विराट आणि अनुष्काने स्वत: 2 कोटींचे योगदान दिले आहे. अनुष्का आणि विराटने याबाबत सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
अनुष्काने सोशल मीडिया अकाउंटवर विराट कोहलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपला देश लढा देत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या लोकांच्या समस्या पाहून मला दु:ख झाले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे.’
ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरण खरेदी केले जातील
अनुष्का आणि विराट यांनी किट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या सहयोगाने मोहिम सुरु केली आहे. सात दिवस ही मोहिम चालवली जाईल. यातून जमा झालेला निधी ACT ग्रांट्सकडे सोपवला जाईल. हा निधी गरजूंसाठी ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे आणि लसीकरणाच्या सुविधा पुरवण्यासाठी वापरला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.