आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट-अनुष्काने दिली 'गुड न्यूज':विरुष्का लवकरच होणार आहेत आई-बाबा, जानेवारी 2021 मध्ये घरी येणार आहे चिमुकला पाहुणा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट आणि अनुष्का 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत लग्नाच्या बेडीत अडकले होते.
  • सध्या विराट आयपीएलच्या तयारीसाठी यूएईमध्ये आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो शेअर करुन, ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Aug 26, 2020 at 10:32pm PDT

आज सकाळी विराटनेदेखील हाच फोटो शेअर करुन ही गोड बातमी दिली आहे. सध्या विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी), च्या टीमसोबत यूएईमध्ये आहे. त्याचा सहा दिवसांचा क्वारंटाइन काळ आज म्हणज गुरुवारी संपतोय.

View this post on Instagram

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Aug 26, 2020 at 10:32pm PDT

विराट आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी आपल्या मनातील गोष्ट अतिशय सुंदररित्या सांगितली होती. विरुष्काने आपल्या पोस्ट्समध्ये प्रेमाचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केले होते.

  • प्रेम करणे म्हणजे देवाचा चेहरा पाहण्यासारखे आहे

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला अनुष्काने लग्नातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत म्हटले होते, 'कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे देवाचा चेहरा पाहण्यासारखे आहे- विक्टर ह्यूगो. प्रेमाबद्दल सांगायचे तर तो फक्त एक भाव नसून त्याहून खूप काही आहे. मी फार नशीबवान आहे की मला तू भेटलास.'

विराटनेही दोघांच्या लग्नातला फोटो शेअर करत म्हटले होते की, 'वास्तवात फक्त प्रेमच आहे अजून काही नाही आणि देव जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती देतो जी दरदिवशी याच गोष्टीची जाणीव करून देतो तेव्हा तुम्ही फक्त आभार मानू शकता.'