आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी थर्ड वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:साखरपुडा, मेंदी, हळदीपासून ते लग्नापर्यंत, बघा 'विरुष्का'च्या लग्न सोहळ्यातील अविस्मरणीय क्षण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस आहे.

लवकरच हे दोघे आता आईबाबा होणार आहेत. जानेवारी महिन्यात अनुष्का आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विराट आणि अनुष्का यांनी लग्न केले होते. मेंदी सेरेमनीत अनुष्काने डिझायनर ड्रेस परिधान केला होता.

इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा त्यावर्षी झाली होती.

विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती.

विराट आणि अनुष्काने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते विवाहबंधनात अडकल्याचे जाहीर केले होते.

इटलीतील टस्कनी येथे हा विवाहसोहळा पार पडला होता.

विराट कोहलीने ट्विट करत म्हटले होते, ‘आज आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्यातचे वचन दिले. ही गोष्ट चाहते, मित्र- परिवारासोबत शेअर करताना अत्यानंद होत आहे. तुमच्या सदिच्छा अशाच आमच्या पाठिशी राहो. आमच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याबद्दल धन्यवाद.’

अनुष्का लाइट पिंक कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली होती. तर विराटने लग्नात ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती.

तर साखरपुड्याला विराट सूटमध्ये दिसला तर अनुष्कासाठी वेलवेटची रेड कलरची साडी डिझाइन करण्यात आली होती.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे वेडिंग ड्रेसेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी डिझाइन केले होते.

लग्नानंतर अनुष्का आणि विराट यांनी दोन वेडिंग रिसेप्शन दिले होते. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे वेडिंग रिसेप्शन झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser